Two Bangladeshi nationals caught in Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : पती-पत्नी नसतानाही राहायचे एकत्र; नाशिकमध्ये हॉटेलात कूक म्हणून काम, पोलिसांनी दोन बांग्लादेशींचा डाव उधळला

Bangladeshi nationals arrested Sinnar : नाशिकच्या सिन्नर शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एक वर्षापासून अवैधरीत्या आपली मूळ ओळख लपवून, बनावट कागदपत्रे बाळगून राहणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली.

Ganesh Sonawane

Bangladeshis working at Nashik hotel arrested: नाशिकच्या सिन्नर शहरातील पांडवनगरी भागातील श्रुती अपार्टमेंटमध्ये मागील एक वर्षापासून अवैधरीत्या आपली मूळ ओळख लपवून राहणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना सिन्नर पोलिसांनी अटक केली.

दोघांकडून बनावट आधारकार्ड, वाहनचालक परवाना, सीमकार्ड, डेबीटकार्ड हस्तगत करण्यात आले आहे. तर, तपासात अनेक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ताब्यात घेतलेल्या दोघा बांग्लादेशींनी सुरुवातीला बनावट नावे सांगितली होती. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर खरी नावे सांगितली.

मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर पोलिसांना गोपनीयरित्या माहिती मिळाली की, पांडवनगरीत एका फ्लॅटमध्ये १ पुरुष आणि १ महिला अत्यंत संशयास्पद रीतीने राहत आहेत. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तपास केला असता चौकशीत खोटी, संशयास्पद व उडवा उडवीची उत्तरे देण्यात आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.

दोघांनी सुरुवातीला, मीलन सुलतान सरदार, वर्षा सुलतान शेख अशी खोटी नावे सांगितली. कोलकता येथील राहणार असल्याचं खोटं सांगितलं. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केली असता दोघांनी बांग्लादेशी असल्याचे कबुल केले.

मीलन सुलतान सरदार (वय ३४, रा जामरोल डंगा, सरदारवाडी, ता. कालिया, जि. नराईल, बांगलादेश), बोरशा सुलतान मुनीर शेख उर्फ शिवली खानम हबीबउर रहमान रुबेल (३३, रा. माधवपाशा, ता. कालिया, जि. नराईल, बांगलादेश) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

दोघांचे आधारकार्ड तपासले असता ते बनावट असल्याचा संशय आला. त्यानंतर दोघांचीही कसून चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडे वास्तव्यासाठी कोणताही पासपोर्ट, व्हीसा, परवाना मिळून आला नाही.

यापूर्वी दोघेही मुंबई, सुरत येथे वास्तव्यास होते. वर्षभरापासून ते सिन्नरला आले होते. ते नाशिक येथील एका हॉटेलमध्ये स्वयंपाकाचे (कूक) म्हणून काम करत होते. धक्कादायक म्हणजे हे या दोघे प्रत्यक्षात पती-पत्नी नसतानाही सिन्नरमध्ये एकाच खोलीत पती-पत्नी असल्याचे भासवून भाड्याने राहत होते.

सिन्नरमध्ये राहण्यापूर्वी ते सुरुवातीला कोलकाता, मुंबई आणि नंतर काही काळ सुरत येथे वास्तव्यास होते. संशयितांनी कोलकाता, सुरत आणि सिन्नर अशा तिन्ही ठिकाणच्या पत्त्यांवर बनावट पद्धतीने आधार कार्ड तयार करून घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT