Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

सावध व्हा, आधी दुप्पट दर देतील, नंतर जनतेला नागवतील!

Sampat Devgire

नाशिक : एव्हढे शेतकरी मृत्यूमुखी पडले. (So many farmers dead in Farmers agaitaion going on from eight months) देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती यावर चकार शब्द बोलत नाहीत. किरकोळ काही झाले की लगेच त्यांचे ट्वीट असते. (They tweet on minor issues) एव्हढ्या मोठ्या घटनेनंतर निषेध तर सोडाच दुःख देखील प्रकट केलेले नाही. (But they didn`t speak a single word on so big incident) याची खंत वाटत नाही का? असा सवाल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला.

भारतीय जनता पक्षाचा या बंदला विरोध आहे, याबाबत श्री. भुजबळ म्हणाले, भाजपचा या आंदोलनाला विरोध असणारच आहे. कारण हे जे आंदोलन आहे, ते भाजपचे मंत्री व त्यांच्या पुत्राने केलेल्या अत्याचाराच्या विरोधात आहे.

ते म्हणाले, हा बंदच मुळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आहे. उत्तर प्रदेशात जे शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्यात माझ्या विरोधात कसे काय तुम्ही आंदोलन करतात, हे बघतोच मी असे सांगून मंत्री व मंत्रीपुत्र जे आहेत ते चॅलेंज देतात. त्यानंतर उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर गाड्या घालून चिरडून मारताहेत काय, त्यात शेतकरी ठार झालेले आहेत. यामध्ये फार मोठा फरक आहे. आणि हा शेतकऱ्यांसाठीच हा बंद आहे. ते जे शेतकरी जेआंदोलन करीत आहेत, त्यात आपल्याकडच्या शेतकऱ्यांचा देखील फायदाच आहे. त्यामुळे अशा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही चिरडून मारू शकणार नाहीत. हे चालणार नाही. असे झाले तर देश तुमच्या विरोधात जाईल. महाराष्ट्र हे सहन करणार नाही हा एक संदेश यातून देण्यात येत आहे.

श्री. भुजबळ यांनी बंदबाबत भूमिका विषद केली. काही व्यापारी त्यांना माननारे आहेत. काही आम्हाला माननारे आहेत. काही बाजपचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. हे सगळे समजून घेतले पाहिजे. त्यामुळे पक्षाचा जो आदेश असेल तसे त्यांना वागावे लागते. त्यामुळे बंदचे जे आवाहन आहे त्याला थोडेसे आडेव जाण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. हे आपण समजून घेतले पाहिजे. मात्र भाजपचा प्रयत्न सफल होणार नाही.

ते म्हणाले, मुळात हे जे आंदोलन सुरु आहे, ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरु आहे. त्यात हमी भाव यावर हे आंदोलन सुरु आहे. लहान लहान प्रश्न आहेत. ज्यावर हे क्षेत्र चालते त्याचाही विचार यात करावा लागतो. जसे मोबाईल कंपनीत एक मोठे गृहस्थ शिरले आणि त्यांनी सबंध मोबाईलचे क्षेत्र काबीज केले. स्वतःची मोनोपली निर्माण केली. मग बाकीचे सगळे संपले. मग हे वाटेल तो निर्णय घ्यायला, वाटेल तसे दर वाढवायला मोकळे. त्याच्याशिवाय आपल्याला दुसरे गत्यंतरच नसते. मुंबईच्या सबर्बन इलेक्ट्रीसिटी कंपनीची स्थिती पाहिली तर हीच स्थिती आहे. मुंबई बेट व मुंबई बाहेरचे जे क्षेत्र आहे, माहीमपासून बोरीवलीपर्यंतचा भाग. तीथे एक रुपया दर असेल तर इकडे तीन ते चार रुपये दर आहे. वाटेल तसे ते वाढवतात. घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. भविष्यात हे असेच होणार आहे.

वेळीच सावध व्हावे

ते म्हणाले, शेतकरी ज्या भूमिकेवर आंदोलन करीत आहे. ते समजून घ्या. अन्यथा त्याचा फार मोठा फटका आपल्याला सहन करावा लागेल. वेळीच सावध झालेले बरे. हे जे लोक (उद्योजक) येतात, ते सुरवातीला एखाद्या शेतीमालाचा दर दहा रुपये असेल, तर ते वीस रुपये देतात. काही दिवस हे सर्व चालेल. हळु हळु या सर्व बाकीच्या संस्था बंद होतील. त्या बंद झाल्या की, यांच्या हातामध्ये सगळे येईल. हे म्हणतील तो दर. तो भाव. तर या मोनोपली ज्या होत आहेत, एकत्र येऊन करीत आहे, ते आपल्या सर्वांना अतिशय अडचणीचे होणार आहे. विशेषतः गरीब समाजाला जास्त मारक आहे. तसेच ते शेतकऱ्यांनाही मारक आहेत. कामगारांना, खरेदी करणाऱ्यांनाही मारक आहे. ज्या अर्थी गेल्या वर्षभरात लाखो शेतकरी ज्या वेळेला आंदोलन करीत आहेत. विविध स्तरांवर ते आंदोलनात सक्रीय आहेत. दोनशेहून जास्त लोक त्यात मृत्यूमुखी पडले आहेत. काही कारण असल्याशिवाय हे घडते का? आपली बायका मुल घेऊन ेह लोक आंदोलन करीत आहेत, त्यांचा विचार करणार की नाही.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT