नाशिक : जमावाकडून मारहाणीच्या घटना घडतच असल्याने अखेर अशाप्रकारे मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्याविरोधातही गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी दिले आहेत. (Police warns people not to beat any one)
मुले पळविणारे समजून जमावाकडून (Mob) बेदम मारहाणीच्या (Beating) घटनाही वाढल्या आहेत. यासंदर्भात पोलिसांकडून (Police) वारंवार मुले पळविणारी कोणतीही टोळी (Gangs) सक्रिय नसल्याने नागरिकांनी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून व्हायरल होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन केले जात आहे.
दोन आठवड्यांमध्ये शहरात लहान मुले पळविणारे समजून जमावाकडून बेदम मारहाणीच्या तीन-चार घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असून, जमावाकडून कायदा हाती घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडल दोनचे उपायुक्त अमोल तांबे यांनी गंभीर दखल घेतली असून, त्यांनी जमावाकडून मारहाणीप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
दोन दिवसांपूर्वी वडाळागावात बुरखा घालून आलेल्या युवकाला मारहाण केल्याप्रकरणी जमावाविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. या मारहाणीचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्या व्हायरल व्हिडीओतील मारहाण करताना दिसणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत. हा युवक परिसरात बुरखा घालून आला असता, त्याच्या पायातील स्पोर्टस् शूज आणि जीन्स पॅन्टमुळे तो मुलगा असल्याचे लक्षात आल्याने जमावाने त्यास मुले पळविणारा समजून बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी अरबाज शेख याच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, सहायक उपनिरीक्षक पठाण तपास करीत आहेत.
अंबडमध्येही घटनेची पुनर्रावृत्ती
सिडकोतील महाराणा प्रताप चौकात अशा घटनेची पुनर्रावृत्ती शनिवारी (ता. २४) रात्री झाली. एका महिलेला मुले पळविणारी समजून काही जणांनी त्या महिलेला मारहाण केली. संबंधित महिला विनवणी करीत असतानाही संबंधित जमावाने तिचे काहीही ऐकून न घेता तिला मारहाण केली. या घटनेची अंबड पोलिसांत नोंद झाली असून, याप्रकरणी संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी सांगितले.
...
मुले पळविण्यासंदर्भातील अफवा सोशल मीडियावर पसरविली आहे, तशी कोणतीही घटना शहरात अद्यापपर्यंत घडलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी संयम न गमावता विनाकारण कोणालाही मारहाण करू नये. तसे केल्यास संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल. संशयास्पद व्यक्ती वा महिला आढळून आल्यास त्याची माहिती सर्वप्रथम पोलिसांना द्यावी. कायदा हातात घेऊन मारहाण करू नका.
- अमोल तांबे, पोलिस उपायुक्त, नाशिक
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.