BJP Politics: भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री हे सध्या धनंजय मुंडे यांचे पाठराखण केल्याने चर्चेत आले आहेत. त्यानंतर आता भाजपच्या नेत्यांनीही नामदेव शास्त्री यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. नामदेव शास्त्री यांनी न्यायाने वागावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते सुनील केदार यांनी महंत नामदेव शास्त्रींवर टीका केली आहे. भगवानगडाचे महत्त्व आणि श्रद्धा नामदेव शास्त्री यांच्या वर्तनाने बाधित होऊ शकते. त्यामुळे नामदेव शास्त्री यांनी आपले वर्तन सुधारले पाहिजे.
मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घून हत्या झाली होती. त्याने सबंध बीड जिल्ह्यात मोर्चे निघाले. राज्यात संतापाची लाट उसळली होती. त्यावर नामदेव शाश्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची बाजू घेतली होती. त्यानंतर अनेक घटकांतून नामदेव शाश्त्री यांच्यावर टिका झाली. त्यात भाजपचीही भर पडली आहे.
या संदर्भात श्री केदार यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना नामदेव शास्त्री यांनी भगवानगडावर येण्यास मज्जाव केला होता. त्यांना कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आली होती हे सर्व करण्यामागे त्यांचा उद्देश योग्य नव्हता असे त्यांनी सांगितले.
पण गडाच्या महंतपदी नियुक्ती करण्यासाठी (कै) गोपीनाथ मुंडे यांनी नामदेव शास्त्रींचे नाव सुचवले होते. त्यामुळे त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आले. गोपीनाथ मुंडे यांच्या कारकिर्दीतच भगवानगडाचे कार्य देशभर पसरले. याचा नामदेव शास्त्रींना विसर पडला की काय? असा प्रश्न करण्यात आला आहे.
(कै) गोपीनाथ मुंडे दरवर्षी दसरा मेळावा भगवानगडावर घेत होते. त्यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने तेथे जमत असत. मात्र श्री मुंडे यांच्यानंतर त्यांची कन्या पंकजाताई मुंडे यांना तेथे मेळावा घेण्यास नामदेव शास्त्री यांनी मज्जाव केला. पंकजाताईंना गडाचे दरवाजे बंद करणे, हे अयोग्य होते.
महंत नामदेव शास्त्री यांच्या डोक्यात सध्या राजकीय क्रीडा वळवळत आहे, अशी टिका श्री. केदार यांनी केली. ते म्हणाले, हे समाजाला फार पूर्वीच समजले होते. (कै)मुंडे यांच्या कन्येला बंदी करणे, यातून नामदेव शास्त्री काय साध्य करू पहात आहेत. याचे अनेकांना कोडे पडले आहे. महंत शास्त्री यांच्या मुळे मंत्री पंकजा मुंडे यांना खूप त्रास भोगावा लागला. त्यामुळे स्वतःला न्यायाचार्य म्हणविणाऱ्या नामदेव शास्त्री यांनी न्यायाच्या भूमिकेतच काम करावे. धृतराष्ट्राच्या भूमिकेत जाऊ नये.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.