Bhaskar Bhagare with NAFED Officesrs Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhaskar Bhagare Politics: भास्कर भगरे यांनी ‘नाफेड’ची केली कोंडी, थेट कांदा खरेदीची मागणी!

Bhaskar Bhagare; NCP MP Bhaskar Bhagre reaches Nafed's godown, buys onions directly -‘नाफेड’च्या कांदा खरेदी ते भ्रष्टाचार रोखण्यासाठी खासदार भास्कर भगरे सक्रिय.

Sampat Devgire

Bhaskar Bhagare News: कांदा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. केंद्र शासनाने निर्यात बंदी आणि आयात शुल्क हटविले. मात्र त्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागल्याने शेतकरी संकटात आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासन काय निर्णय घेते याची उत्सुकता आहे.

‘नाफेड’ ही केंद्र शासनाची कांदा खरेदी करणारी महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेमुळे बाजारातील हस्तक्षेपाद्वारे कांद्याचे दर नियंत्रित केले जातात. उद्यापासून ‘नाफेड’ कांदा खरेदी करणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी थेट नाफेडच्या गोदामांना भेटी दिल्या.

‘नाफेड’ कडे नाशिक जिल्ह्यात साठवणूक करण्याची मोठी क्षमता आहे. मात्र ‘नाफेड’ थेट खरेदी न करता सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत खरेदी करते. त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे भास्कर भगरे यांनी नेमके यावर बोट ठेवत ‘नाफेड’ला कोंडीत पकडले आहे.

या संदर्भात भास्कर भगरे यांनी ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. ‘नाफेड’ संस्थेने थेट बाजार समितीच्या लिलावंत भाग घ्यावा. त्याद्वारे बाजारभावाप्रमाणे कांदा खरेदी केल्यास केंद्र सरकारलाही स्वस्त कांदा उपलब्ध होऊ शकेल. मध्यस्थांची साखळी नष्ट झाल्याने त्याचा फायदा शेतकरी तसेच ग्राहकांना होईल, असा दावा त्यांनी केला.

यंदा गेल्या महिन्यात केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द केले. हे २० टक्के शुल्क रद्द केल्याचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना झालेला नाही. यात शुल्क हटविल्यानंतरही कांद्याचे दर कोसळत आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या प्रश्नावर विविध शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांनी केंद्र शासनाला धारेवर धरले आहे.

खासदार भगरे यांनी सहकारी संस्था कमकुवत झालेल्या आहेत. संस्थांमार्फत गतवर्षी कांदा खरेदी करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. ‘नाफेड’च्या आणि ‘एनसीसीएफ’ संस्थेच्या प्रशासनाने ही त्याला दुजोरा दिला आहे. यासंदर्भात काही अधिकाऱ्यांची चौकशी देखील झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणि भ्रष्टाचार याला कारणीभूत असलेली कांदा खरेदी ची पद्धत रद्द करावी. थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करा अशी मागणी खासदार भगरे यांनी केली.

--------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT