MLA Suhas kande welcomes NCP workers in Shivsena
MLA Suhas kande welcomes NCP workers in Shivsena Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आमदार सुहास कांदेचा नांदगावमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का

Sampat Devgire

नांदगाव : पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) व माजी आमदार पंकज भुजबळ यांचे समर्थक व समता परिषदेचे माजी शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. यानिमित्ताने नांदगावच्या राजकारणात आमदार कांदे यांनी राष्ट्रवादीला (NCP) धक्का दिला आहे.

पालकमंत्री श्री. भुजबळ आणि शिवसेना आमदार कांदे यांच्यात जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीच्या विनियोगावरून नांदगाव मतदारसंघात वाद सुरु होता. या पार्श्वभूमीवर आणदार कांदे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दर्शवित या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ऐन जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी हा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी सभापती राजेंद्र चंवर, वेहेळगावचे भावडू गिते, वाल्मिक अहिरे, सुरेश बोरसे, अण्णा सुरसे, निलेश सुरसे, एकनाथ मोरे यांचा समावेश आहे. आमदार कांदे व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. गुरुवारी साकोरा येथे जिल्हा परिषद गटातील शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यात हा पक्षप्रवेश झाला.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, पंचायत समिती सभापती सुभाष कुटे, सदस्या सुमन निकम, राजाभाऊ जगताप, विष्णू निकम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख किरण देवरे, गुलाब भाबड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT