प्रदीप पेेंढारे -
Ahmednagar News : मराठा आरक्षणावरून आरोप -प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे, तर दुसरीकडे मराठा संघटनांनी सरकारविरोधात आघाडी उघडत आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठिकठिकाणी जाळपोळ,तोडफोड, रास्ता रोको, निषेध आंदोलनं, बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
नगर जिल्ह्यातून शिवसेना एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकाचवेळी 28 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगर जिल्ह्यातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिऱ्यांनी हे सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र उपसले. शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी सामूहिक राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी तत्काळ निर्णय घ्यावी, अशी मागणी सामूहिक राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जिल्हाप्रमुख अण्णा म्हसे, जयवंत पवार, आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संपत जाधव महाराज, जिल्हा उपाध्यक्ष गोरक्षनाथ रामफळे, दक्षिण उपजिल्हाप्रमुख शाम गोसावी, शेतकरी सेना तालुकाप्रमुख किशोर मोरे, शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे श्रीरामपूर तालुकाप्रमुख वसंत खरात, नेवासे तालुकाप्रमुख सोमनाथ पाटील महाराज, राहुरी तालुका प्रमुख बाळासाहेब मुसमाडे, किरण देशमुख, पारनेर तालुकाप्रमुख अनिल टेकुडे यांचा समावेश आहे.
अकोले तालुकाप्रमुख तुकाराम अरोटे, शेवगाव तालुकाप्रमुख कल्याण काळे महाराज, राहाता तालुकाप्रमुख संतोष दीक्षित, कोपरगाव तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत कर्डिले, संगमनेर तालुकाप्रमुख दिलीप पवार, नगर तालुकाप्रमुख राजराजेश्वर शास्त्री,श्रीगोंदे तालुकाप्रमुख अक्षय मोरे यांच्यासह 28 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
राहुरीत मंगळवारी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बंद पाळण्यात आला. राहुरी तहसील कार्यालयात सुरू असलेल्या साखळी उपोषणाला चिंचविहिरे, गणेगाव, वडनेर आणि कनगर येथील तरुणांनी सहभागी होत पाठिंबा दिला.
राहुरी कारखाना, राहुरी खुर्द, देवळाली प्रवरासह ग्रामीण भागात बंद प्रतिसाद मिळाला. राहुरीतील दळणवळण व्यवस्था बंद होती. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा दंड थोपटले आहे. त्यामुळे सत्ताधारींसह विरोधी पक्षांच्या नेत्यांचीही चांगलीच कोंडी झाली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.