Sanjay Raut and Rekha Thakur Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vanchit Bahujan Aaghadi : 'इंडिया' आघाडीत सहभागी झाल्याची राऊतांची घोषणा ही धूळफेक : 'वंचित'चा खुलासा

सरकारनामा ब्यूरो

सचिन देशपांडे-

Nashik News : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी 'वंचित' 'इंडिया' आघाडीत सहभागी झाल्याचे जाहीर केले. मात्र, संजय राऊत यांनी घोषित केलेली ही 'फेकन्यूज' असल्याचे 'वंचित'ने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांची घोषणा ही 'धूळफेक' असल्याचा गंभीर आरोप 'वंचित'ने केला आहे. त्यामुळे वंचितचा वकीलच धूळफेक आणि फेकन्यूज पसरविण्यात गुंतल्याचे चित्र असून अखेर 'वंचित'ला समोर येत सत्य जगासमोर मांडावे लागले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या दिल्लीतील बैठकीनंतर संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडी (VBA) 'इंडिया' आणि महाविकास आघाडीत सहभागी झाल्याचे जाहीर केल्यानंतर 'वंचित'चे युवानेते सुजात आंबेडकर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. संजय राऊत यांचा दावा धूळफेक करणारा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

याविषयी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनीदेखील अशा प्रकारे वंचित, महाविकास आघाडी, तसेच 'इंडिया' आघाडीत सहभागी झाल्याच्या बातम्यांचे खंडन केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित हे 'इंडिया' त्याचबरोबर महाविकास आघाडीत समाविष्ट झाल्याचे चित्र अद्याप तरी अस्पष्ट आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या विषयावर जोपर्यंत वंचित बहुजन आघाडीला अशा बैठकांचे अधिकृत निमंत्रण येत नाही, जागावाटपाच्या चर्चेत बोलाविले जात नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी ही 'इंडिया' आणि महाविकास आघाडीत सहभागी झाल्याच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचे वंचितने स्पष्ट केले आहे. केवळ दिल्लीतील बैठकीत 'वंचित' 'इंडिया' आघाडीत सहभागी झाल्याची चर्चा झाल्याचे समजते, पण त्यावर ठोस निर्णय झाला नसल्याचा दावा वंचितचा आहे. त्यामुळे वंचित 'इंडिया' आघाडीत सहभागी झाल्याचा संजय राऊत यांचा दावा धूळफेक करणारा असल्याचे वंचितने स्पष्ट केले आहे.

सुजात आंबेडकर यांच्या तीन अटी

याविषयी सुजात आंबेडकर यांनी वंचित हे 'इंडिया' आघाडीत सहभागी झाल्याच्या 'फेकन्यूज'वर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. 'इंडिया' आणि महाविकास आघाडीत 'वंचित'चा सहभाग या पक्षांना पाहिजे असेल तर 'वंचित'च्या नेत्यांना जागावाटपाच्या चर्चेत सहभागी करण्याचे, वंचितला लिखित आमंत्रण देण्याचे आणि चार पक्षांच्या एकत्रित राजकीय सभांची गरज सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केली. जोपर्यंत या तीन गोष्टी होत नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी ही 'इंडिया' आणि महाविकास आघाडीत सहभागी झाली आहे, यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले आहे.

Edited By- Ganesh Thombare

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT