Ex corporators with CM Eknath Shinde
Ex corporators with CM Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena News: ठाकरे गटाला मोठा धक्का; अकरा नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

Sampat Devgire

नाशिक : राज्यात शिंदे गटाचे (Eknath Shinde) सरकार स्थापन होऊन सहा महिने उलटले, तरी नाशिकमध्ये (Nashik) फारसे यश हाती मिळत नव्हते. मात्र डिसेंबर महिन्याचा अखेर शिंदे गटासाठी लाभदायक ठरला आहे. शिवसेनेच्या (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackarey) गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत जवळपास अकरा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. (NMC) यामध्ये निष्ठावाण व निष्ठेची शपथ घेतलेले नगरसेवकच असल्याने महापालिका निवडणुकीपूर्वी हा मोठा धक्का ठाकरे गटाला बसला आहे. संजय राऊत दोन दिवसांपूर्वीच नाशिकला आले होते, त्यांची पाठ फिरताच हा प्रवेश झाला. (After Sanjay Raut`svisit to Nashik 11 Ex corporators join shinde Group In nashik)

प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये माजी उपमहापौर व महानगरप्रमुख अजय बोरस्ते, सुर्यकांत लवटे, सुवर्णा महाले, आर. डी. धोंगडे, ज्योती खोले, सुदाम डेमसे, जयश्री खर्जुल, प्रताप मेहरोलीया, सचिन भोसले, चंद्रकांत खोडे, पुनम मोगरे, राजु लवटे यांचा समावेष असल्याने एकनाथ शिंदे गटाचे महानगरप्रमुख वंटी तिदमे यांनी सांगितले. या प्रवेशाच्या वेळी पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

हे नगरसेवक गुरुवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने मध्यरात्रीच्या सुमारास प्रवेश झाला आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनसेच्या शहराच्या एका नेत्याचा, तर भाजपच्या माजी नगरसेविकेच्या वडिलांचा समावेश आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जसा झटका मानला जात आहे, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षासाठी देखील हा मोठा धक्का आहे. शहरात भाजपची ताकद वाढवण्यासाठी शिवसेनेतील नाराजांना सामावून घेता न आल्याचे अपयश गिरीश महाजन यांच्या पदरी पडले आहे.

होय, आम्ही शिंदे गटात गेलो

आत्तापर्यंत शिवसेनेशी गद्दारी करणार नाही, यासह मीडियामधून आलेल्या बातम्या चुकीच्या व पेरण्यात आल्याचा आरोप करणाऱ्यांनीच आघाडी घेत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्यांची यादी तयार करून सायंकाळी सहाला तयार होण्याच्या सूचना देण्यात आल्या. साडेसातला जवळपास बारा माजी नगरसेवकांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला. आतापर्यंत स्पष्ट भूमिका न घेणाऱ्या माजी नगरसेवकांनीच होय, आम्ही शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे स्पष्टपणे जाहीर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT