Firing
Firing Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Firing in Agriculture Fest: कृषी विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील 'तो' गोळीबार निघाला 'फुसका'

सरकारनामा ब्यूरो

नांदेड : राज्याच्या कृषी विभागाकडून 24 डिसेंबरपासून कला व क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवादरम्यान सोमवारी (दि.२६) शहरातील कुसुम सभागृहात कृषी विभागातील अधिकाऱ्यानं हवेत गोळीबार केल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ उडाली होती. याबाबत आता महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. कृषी विभागातील (Agriculture department festival) अधिकाऱ्यानं केलेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी केलेल्या चौकशीत खेळण्यातील एअरगन असल्याची स्पष्ट झाले आहे.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व संवर्ग कर्मचारी संघटनेकडून जिल्हास्तरीय कृषी कला व क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. शनिवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. यात खोखो, कबड्डी, क्रिकेट, हॉलीबॉलसारखे मैदानी खेळ घेण्यात आले. या कार्यक्रमाचा समारोप सोमवारी (ता.२६) कुसूम सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमानं झाला.

यावेळी नाच गाण्यावर एका अधिकाऱ्याने पिस्तूल नाचवून हवेत गोळीबार केल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसारीत केले. यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांनी शिवाजीनगर पोलिसांना या प्रकरणाची माहिती घेऊन अहवाल देण्याचे आदेश दिले.

शिवाजीनगर पोलिसांनी नवीन मोंढा येथील कृषी अधीक्षक कार्यालयात जाऊन चौकशी केली. काही कर्मचार्‍यांचा जवाब नोंदवण्यात आला आहे. याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगीतले की, जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातर्ंगत कर्मचारी संघटनेकडून जिल्हास्तरीय कला व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. यात शासनाचा कोणताही सहभाग नव्हता. स्पर्धा तसेच कार्यक्रम यशस्वी पार पडले. यात गोळीबारासारखी कुठलीही घटना घडली नाही.

खेळण्यातील 'एअरगन'...

कृषी विभागाच्या कला व क्रीडा महोत्सव दरम्यान कुसुमताई सभागृह येथे कार्यक्रमात वापरलेली पिस्टल नसून ती खेळण्यातील एअरगन होती अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी लष्करे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. कार्यक्रमात हवेत फायरिंग केल्याबाबतच्या बातमीच्या अनुषंगाने सत्यता पडताळणीबाबत पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी पोलिस निरीक्षक उबाळे यांना आदेशीत केले. त्याबाबत ती बंदूक खेळण्यातील एअर गन असल्याचं निष्पन्न झालं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT