Girish Mahajan BJP leader Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics : भाजपला आव्हान देणारा शहराध्यक्ष ठरला फुसका बार! सपशेल शरणागती; संकटमोचक महाजनांनी फिरवली चावी!

Nashik Mayor News : महापौर आणि उपमहापौर पदाचा निवडणुकीत भाजप पक्षात जोरदार अंतर्गत राजकारण रंगले. या निवडणुकीच्या श्रेय घेऊ पाहणाऱ्या शहराध्यक्ष सुनील केदार यांचे भूमिका पुन्हा चर्चेत आली. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते सावध झाले आहेत.

Sampat Devgire

Nashik News : नाशिक महापालिकेत भाजपला बहुमतापेक्षा अधिक जागा आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षाचे उमेदवार जाहीर केले. महापौर पदासाठी हिमगौरी आडके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांचे नाव जाहीर झाले आहे.

महापौर आणि उपमहापौर यांची घोषणा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केली होती. त्यात मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख भूमिका होती. नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांच्या सुकाणू समितीचा आहे त्याला पाठिंबा होता. या सर्व घडामोडी सुरू असतानाच शहराध्यक्ष सुनील केदार यांनी एक घोषणा करून गोंधळ उडवून दिला होता.

आपण सुचलेली नावे विचारात घेतली नाही, असा आरोप करीत त्यांनी पदाचा राजीनामा दिला. प्रदेश नेत्यांकडे राजीनामा पाठविण्याची माहिती त्यांनी दिली. महापौर आणि उपमहापौर निवडणूक एकतर्फी होणार या आनंदात असतानाच पक्षाला हा धक्का होता. एक प्रकारे मंत्री महाजन यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केदार यांनी केला. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला.

मंत्री महाजन यांनी त्यावर काही तासांतच चावी फिरवली. त्यामुळे नव्या शहराध्यक्षांचा शोध सुरू झाल्याची चर्चा पसरली. पक्षाला आव्हान देणाऱ्या केदार यांनी ही चर्चा कानी पडताच घुमजाव केले. आपण राजीनामा मागे घेत असल्याचे परस्पर घोषणा त्यांनी केली. वस्तुत: राजीनामाची बातमी येतात केदार यांच्या विरोधकांनी पक्षाकडे जोरदार लॉगिन केली होती.

महापालिका निवडणुकीत पक्षाला आपल्या नेतृत्वाखाली 72 जागा मिळाल्या असा दावा गेले काही दिवस ते करीत होती. त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांपासून तर गिरीश महाजन यांना आव्हान देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. उमेदवारी देताना त्यांच्यावर मोठे आरोप झाले होते. एबी फॉर्म चा गोंधळ चर्चेत होता.

दबावतंत्र अंगलट

केदार यांच्यावरील आरोपामुळे आधीच वातावरण निर्माण झालेली होती. त्यात महापालिका निवडणुकीचे श्रेय आणि पक्षावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला. आता ते स्वतःच आपले समाधान झाले आहे, असे सांगण्याचा आटापिटा करताना दिसले. मात्र यामागे मंत्री महाजन यांनी फिरविलेली चावी केदार यांच्या अंगलट आली असे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT