BJP`s Yogesh Choudhary in Press confrence
BJP`s Yogesh Choudhary in Press confrence Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजप शहराध्यक्ष योगेश चौधरींना राजकीय द्वेषापोटी हद्दपार केले?

Sampat Devgire

तळोदा : भाजपचे शहराध्यक्ष योगेश चौधरी(BJP City president Yogesh Choudhary) यांनी दिलेले पुरावे वैध ठरवत उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता करीत हद्दपारीचा आदेश रद्द केल्याचे योगेश चौधरी यांनी सांगितले. तसेच केवळ राजकीय द्वेषापोटी हद्दपार केले होते. मात्र न्यायालयाच्या निकालाने शेवटी विरोधकांचा कुटिल डाव फसला असून सत्याचा विजय झाल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजप शहराध्यक्ष योगेश चौधरी यांच्या कार्यालयात रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद झाली. प्रसंगी माजी नगराध्यक्ष जगदीश चौधरी, दिनेश चौधरी, लक्ष्मण चौधरी, रामचंद्र चौधरी, दीपक चौधरी, मयूर चौधरी, कल्पेश चौधरी उपस्थित होते.

यावेळी योगेश चौधरी यांनी सांगितले की, तळोद्याचे उपविभागीय अधिकारी यांनी १७ मार्च २०२१ रोजी हद्दपारी सुनावणीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. त्यात माझ्यावर तीन गुन्हे नोंद असल्याची माहिती कळाली. त्यानंतर त्यांच्या समोर हजर राहून योग्य तो खुलासा केला, तरीही १ जानेवारी २०२१ पासून एका वर्षासाठी तळोदा तालुक्यातून हद्दपारीचे आदेश पारित केले. या आदेशाला आव्हान देण्यासाठी विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या कोर्टात अपील दाखल केले.

शहाद्यातील सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याचे आदेश विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर केले. तरीही विभागीय आयुक्त यांनी १९९६ ते २०१० या काळातील एकूण १३ गुन्हे माझ्या नावे दाखवले. त्यांपैकी तीन गुन्हे माझ्यावर दाखल नसताना केवळ हद्दपार कायम राहावी या हेतूने अपील अर्ज ८ मार्च २०२१ रोजी नामंजूर केला. यामुळे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट पिटीशन दाखल केली. तेथे निर्दोष मुक्तता झालेल्या गुन्ह्यांचे आदेश, निकाल सादर केले. उच्च न्यायालयाने सादर पुरावे वैध ठरवत १४ ऑक्टोबर २०२१ रोजी निर्दोष मुक्त करीत हद्दपारीचा आदेश रद्द केला. यासाठी ॲड. पुष्कर शेंदुर्णीकर यांनी युक्तिवाद केल्याचे चौधरी यांनी सांगितले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT