Kunal Patil & Dr. Subhash Bhamre
Kunal Patil & Dr. Subhash Bhamre Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule APMC Politics: काँग्रेसने भाजप खासदार सुभाष भामरेंचा करेक्ट कार्यक्रम केला!

Sampat Devgire

Dhule APMC Result : जिल्ह्यातील धुळे, साक्री, दोंडाईचा आणि शिरपूर या चार बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. त्यात सर्व प्रस्थापितांनी आपली सत्ता राखली. भाजपला तीन तर काँग्रेसने एक समिती जिंकली. यात धुळ्याच्या बाजार समितीत आमदार कुणाल पाटील यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांना धुळ चारली. त्यामुळे डॉ. भामरे यांची वाटचाल खडतर होण्याची चिन्हे आहेत. शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांच्यासाठी निकाल धोक्याचा इशारा आहे. (Congress MLA Kunal Patil Defeat BJP MP Dr. Subhash Bhamre)

धुळे (Dhule) जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये धुळे शहर वगळता धुळे ग्रामीण, साक्री, दोंडाईचा आणि शिरपूर या चार तालुक्यांतील बाजार समित्यांच्या निवडणुका (APMC election) झाल्या. त्यात प्रस्थापितांनी आपल्या सत्ता राखल्या. भाजपला (BJP) ३ तर काँग्रेसला (Congress) एक असे त्याचे बलाबल आहे.

धुळे जिल्ह्यातील या बाजार समित्यांच्या निवडणुकांत भाजप एकसंघ राहिला नाही. महाविकास आघाडी देखील एकत्रीतपणे निवडणुकांना सामोरी गेली असे म्हणता येत नाही. प्रत्येक नेत्यांने आपली राजकीय सोय पाहून काहींना जवळ केला, काहींना जाणीवपूर्व दूर ठेवले. त्यामुळे या निकालांचा परिणाम काय? असा विचार केल्यास जे जिंकले ते सत्ता मिळाल्याने शांत होतात, मात्र जे पराभूत होतात, ते अस्वस्थ झाल्याने त्वेषाने कामाला लागतात असे होते. त्याचा विचार केल्यास साक्री वगळता विधानसभेच्या अन्य मतदारसंघात प्रस्थापितांना जागरूक रहावे लागले, असे हे निकाल सांगतात.

साक्री तालुक्यात गेली तीस वर्षे आमदार अमरिशभाई पटेल यांची सत्ता आहे. नगरपालिकेपासून तर सर्व सत्ताकेंद्र त्यांच्याच ताब्यात आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अॅड गोपालसिंग राजपुत, मनोहर पाटील, डॉ. मनोज महाजन `सीपीएम`चे हिरालाल परदेशी यांनी पॅनल केले होते. ते लढले त्वेषाने मात्र पटेल यांच्या सत्ता, पद आणि राजकीय प्रभावापुढे ते प्रभावी ठरले नाही. सामान्यतः पटेल यांना ७५० तर आघाडीला २५० मते मिळाली. एव्हढा मोठा फरक राहिला. पुर्वी पटेल काँग्रेसचे होते तेव्हा काँग्रेस व आता ते भाजपमध्ये असल्याने भाजप जिंकला. यामध्ये काँग्रेसकडून नव्या पिढीच्या व दमदार नेतृत्वाला संधी दिल्यास लढत होईल.

साक्री तालुक्यात गेली तीस वर्षे आमदार अमरिशभाई पटेल यांची सत्ता आहे. नगरपालिकेपासून तर सर्व सत्ताकेंद्र त्यांच्याच ताब्यात आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अॅड गोपालसिंग राजपुत, मनोहर पाटील, डॉ. मनोज महाजन `सीपीएम`चे हिरालाल परदेशी यांनी पॅनल केले होते. ते लढले त्वेषाने मात्र पटेल यांच्या सत्ता, पद आणि राजकीय प्रभावापुढे ते प्रभावी ठरले नाही. सामान्यतः पटेल यांना ७५० तर आघाडीला २५० मते मिळाली. एव्हढा मोठा फरक राहिला. पुर्वी पटेल काँग्रेसचे होते तेव्हा काँग्रेस व आता ते भाजपमध्ये असल्याने भाजप जिंकला. यामध्ये काँग्रेसकडून नव्या पिढीच्या व दमदार नेतृत्वाला संधी दिल्यास लढत होईल.

साक्री बाजार समितीत भाजप नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते व त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी सभापती हर्षवर्धन दहिते यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेत पॅनेल केले. त्यांना १६ जागा मिळाल्या. त्यांच्या विरोधात भाजपचे सुरेश पाटील यांनी शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांच्यासह प२नेल केले होते. त्यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीचे नेते भाजपच्या दोन्ही पॅनेलमध्ये विभागले गेले होते. त्यामुळे येथे भाजप विरूद्ध भाजप अशी लढत होऊन दहिते यांनी सत्ता राखली. यापूर्वी येथेही दहिते काँग्रेसमध्ये होते. त्यांच्याकडे ही बाजार समिती होती. श्री. दहिते भाजपमध्ये गेल्याने बाजार समितीची सत्ता भाजपकडे आली.

धुळे समितीत काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी महाविकास आघाडीचे पॅनल केले होते. त्यांच्या पॅनलने भाजपच्या खासदार सुभाष भामरे तसेच अन्य नेत्यांचा दणदणीत पराभव केला. खरे तर विधानसभा असो वा लोकसभा आमदार पाटील यांची लढत सुभाष भामरे गटाशी असते. सहकारातील बहुतांश सत्ताकेंद्र आमदार पाटील यांच्याकडे आहेत.

अशीच स्थिती दोंडाईचा मतदारसंघात भाजप नेते, माजी मंत्री जयकुमार रावल यांची असुन त्यांनी महाविकास आघाडीचे नेते, माजी मंत्री डॉ. हेमंत पाटील व ज्ञानेश्वर भामरे यांच्या पॅनलचा पराभव केला. या निवडणुकीत रावल यांच्या विरोधकांचे धृविकरण झालेले दिसले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचे पडसाद उमटू शकतात. त्याबाबत त्यांची राजकीय वाटचाल कशी असेल यावर आगामी राजकारण ठरेल. (Political Short Videos)

जिल्ह्यात धुळे शहरात एमआयएमचे फारूक शाह, शिंदे गटाच्या मंजुळा गावित, काँग्रेसचे कुणाल पाटील आणि जयकुमार रावल व शिरपूर असे दोन आणदार भाजपचे आहेत. शहर वगळता प्रस्थापित आमदारांनी आपल्या सत्ता राखल्या. महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा किती परिणाम होईल या वर्तवणे त्यामुळेच अवघड असुन भाजपचे ठिक मात्र शिंदे गटाची जागा धोक्यात असल्याने त्याचा लाभ आघाडीला होऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT