Dhule Corporation Building
Dhule Corporation Building Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP News; भाजप नेते म्हणतात, धुळ्यातील लँड जिहाद रोखा!

Sampat Devgire

धुळे : शहरात (Dhule) मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे. या माध्यमातून शहरात लँड जिहाद सुरू आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने (Police) या प्रश्‍नाकडे वेळीच लक्ष घालून हा प्रकार थांबवावा, अशी मागणी भाजपने (BJP) जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली. या प्रश्नावर भारतीय जनता पक्षाकडून यापूर्वीही आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे भविष्यात हा राजकीय विषय होण्याची चिन्हे आहेत. (BJP is ruling party in Corporation but they are aggressive on encroachments)

भाजपचे नगरसेवक हिरामण गवळी, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिनेश बागूल, भारतीय जनता युवा मोर्चाचे रोहित चांदोडे आदींनी मागणीचे निवेदन दिले. या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी त्यात गांभिर्याने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

धुळे शहरातील नटराज टॉकीजशेजारील ८० फुटी रोडलगतच्या सर्व्हे क्रमांक ३८७ क मधील फायनल प्लॉट-२९ मधील पोलिस ठाणे जागेवरील अतिक्रमण काढण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण करण्यात येत आहे.

आरक्षण क्रमांक-१०५ हॉस्पिटल आणि प्रसूतिगृह जागेसाठी नवीन बेकायदेशीर वॉल कंपाउंड करण्यात आले आहे. हा एक प्रकारे लँड जिहादचा प्रकार असल्याचे भाजपने म्हटले आहे.

याबाबत मनपाकडून माहिती मागितली असता, त्यांनी खुलासा दिला की कोणत्याही प्रकारची मंजुरी न घेता संबंधित आरक्षित जागेवर बेकायदेशीरपणे वॉल कंपाउंड करण्यात आले आहे. तसेच चंद्रशेखर आझादनगरमधील अभय कॉलेजकडील परिसरात जवळपास २५ ते ३० हजार लोकवस्तीचा भाग आहे. त्या भागात जाण्यासाठी एकमेव रस्ता हा नटराज टॉकीजलगतचा असल्याने त्या ठिकाणी काही समाजकंटक घोळका करून उभे राहतात.

त्यात काही स्थानिक लोकांनी अतिक्रमण करून भंगाराची दुकाने लावली आहेत. काही दिवसांपूर्वी एका दूध विक्रेत्याची फोरव्हीलर गाडी थांबवून विनाकारण मारहाण करण्यात आली. ही गाडी एमएसईबी इलेक्ट्रिक डीपीलगतच्या खांबाला वारंवार ठोकून गाडीसह इलेक्ट्रिक खांबाचे नुकसान करण्यात आले.

समाजकंटकांकडून महिलांची छेडखानी करण्याचे प्रकारदेखील अनेकदा घडले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तेथील लोकवस्तीतील लोकांनी त्यांची घरे विकून त्यांना पलायन करण्यास भाग पाडण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. या गोष्टीस आळा घालावा, तसेच नटराज टॉकीजशेजारील आरक्षित जागेवरील अतिक्रमण काढून पोलिस ठाणे लवकरात लवकर उभारावे, अशी मागणी भाजपने केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT