Uddhav-Nimse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Nimse Surrender : भाजपचे उद्धव निमसे 25 दिवस लपले, मग अचानक सरेंडर होण्यामागचे गुपित काय?

Nashik Murder case : राहुल धोत्रे खून प्रकरणात पोलिस उद्धव निमसे यांचा शोध घेत होते. तब्बल 25 दिवसांपासून ते फरार होते. मात्र आता ते अचानक पोलिसांना शरण आले व स्वत:हून हजर झाले.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिकमध्ये बैलपोळ्याच्या दिवशी नांदुरनाका येथे राहुल धोत्रे या युवकाचा निर्घुन खून झाला. प्रकरणात गेल्या २५ दिवसांपासून पसार असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे अखेर सोमवारी (दि. १५) पोलिसांना शरण आले. तब्बल २५ दिवस ते फरार होते, त्यांच्याशोधासाठी पोलिसांनी अनेक पथके रवाना केली होती.

जिल्हा न्यायालयापाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयाने निमसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. या २५ दिवसांत निमसेंनी सुटकेचे अनेक मार्ग चाचपडून पाहिले असावे. परंतु सुटकेचे सर्व मार्ग संपल्यानेच त्यांच्यासमोर पोलिसांसमोर हजर होण्याशिवाय पर्याय उरला नाही, अशी चर्चा सुरु आहे. निमसे सोमवारी (ता. १५) दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास शहर पोलिस गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकासमोर हजर झाले.

निमसे स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. परंतु याप्रकरणात मनसे व शिवसेना(उबाठा) व वंचित बहुजन आघाडीनेही उडी घेतली होती व मोर्चा काढला होता. वंचित बहुजन आघाडीने पीडीत कुटुंबीयांना सोबत घेऊन पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. धोत्रे यांच्या नातेवाईकांनीही तपास यंत्रणेवर संशय व्यक्त केला होता. या सगळ्या प्रकरणात आगामी निवडणुका जवळ आल्या असतानाच भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याचे दिसत होते. उबाठाचे खासदार संजय राऊत यांनीही उद्धव निमसे कुठे लपले यावरुन गंभीर आरोप केले होते. या सर्व परिस्थितीमुळे निमसे पोलिसांना शरण आल्याचे बोलले जात आहे.

निमसे यांना मंगळवारी (दि. १६) जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. संशयित चालक नामदेव मते याने निमसे यांना परराज्यात नेऊन सोडलं होतं. त्यामुळे त्यालाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आलं आहे. निमसे यांच्या मुलाचीही चौकशी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सर्वाच्च न्यायालयात जाण्याचाही पर्याय होता परंतु हा त्रास टाळता यावा म्हणून निमसे स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाले. एफआयआरमध्ये नाव असले तरी प्रत्यक्षात याप्रकरणाशी निमसेंचा संबंध नसल्याचा दावा निमसेंचे वकिल मनोज पिंगळे यांनी केला आहे.

आतापर्यंत पोलिसांनी या खुनाच्या गुन्ह्यात तब्बल १५ संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. धोत्रे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर प्रथम निमसे व त्यांच्या साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र ज्या दिवशी या अर्जावर निकाल लागणार होता, त्याच दिवशी धोत्रे यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जामीन फेटाळण्यात आला. कदाचित त्या वेळी धोत्रे जिवंत असते, तर जामीन मंजूर झाला असता, अशीही चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT