Ahmednagar News : माजी खासदार सुजय विखे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी मतदारसंघात तळ ठोकला आहे. संवादावर भर देत आहेत.
"धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार असल्याचा इशारा दिला. ज्या दारुड्याला घरात आणि गावात कोणी विचारत नाही. तो मोबाईलवर एखादे स्टेटस ठेवतो आणि आपण गाव बंद ठेवतो. आपण सुशिक्षीत असूनही भरकटत चाललोय का? तुम्ही शिक्षण घेऊन काय उपयोग झाला", असा सवाल माजी खासदार विखे यांनी संवादात उपस्थित केला.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक इथं युवक कार्यकर्त्याशी संवाद भाजपचे (BJP) माजी खासदार सुजय विखे यांनी संवाद साधला. "गेल्या 70 वर्षात शिर्डी मतदार संघातील कोणत्याही जाती अथवा धर्माला संरक्षणाची गरज पडली नाही. मात्र आज असं काय झालं की? प्रत्येकाला आपलं अस्तित्व धोक्यात वाटू लागलं. महाराष्ट्र आणि शिर्डी मतदारसंघाबाहेर काय चालू आहे, त्याबद्दल मला काही माहीत नाही. परंतु शिर्डी मतदारसंघात आपण सर्व जण एक आहोत. त्यामुळे धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नाही", असा इशारा सुजय विखे यांनी दिला. युवक कार्यकर्त्याशी संवाद कार्यक्रमात अशोकराव जऱ्हाड, नवनाथ ताजणे, भीमा शिंदे, विशाल जऱ्हाड, प्रमोद जऱ्हाड, संपत भुसाळ उपस्थित होते.
सुजय विखे (Sujay Vikhe) म्हणाले, "ज्या दारुड्याला घरात आणि गावात कोणी विचारत नाही. तो मोबाईलवर एखादे स्टेटस ठेवतो आणि आपण गाव बंद ठेवतो. आपण सुशिक्षीत असूनही भरकटत चाललोय का? तुमचं शिक्षण घेऊन काय उपयोग झाला, असा सवाल डॉ. विखे यांनी उपस्थित करत डॉक्टर असून जर मी भेदभाव मिटवू शकलो नाही, तर माझ्या शिक्षणाचा काय उपयोग? असा सवाल त्यांनी उपस्थित केला". शिर्डी मतदारसंघातील सामाजिक सलोखा बिघडणार नाही आणि मुलीची सुरक्षितता भंग होणार नाही, यांची दक्षता घेण्याचे आवाहन सुजय विखे यांनी केले.
सुजय विखे यांनी ‘जनसेवा युवा मंच अॅप’बाबत माहिती दिली. या अॅपचा उपयोग युवकांचे संघटन, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये युवकांना रोजगाराच्या संधी, विविध अर्ज तसेच गणेश मंडळाची नोंदणी करण्यासाठी प्रामुख्याने उपयोग होणार आहे. 15 सप्टेंबरपर्यंत यांची नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन करताना नोंदणी करणारे युवक माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार असल्याचे सांगितले. तसेच सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांनासाठी संघटनेत काम करणाऱ्या युवकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही विखे यांनी दिली.
एकाचं घरातील उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्रात दोन वेगवेगळे पक्ष चालवत असल्याचे सांगून कार्यकर्त्यानी आता एकमेकांच्या तक्रारी करण्यात वेळ न घालवता विविध योजना घरा-घरापर्यंत पोहचवाव्यात. जेष्ठ कार्यकर्त्यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवून तरुण कार्यकर्त्याशी स्पर्धा न करण्याचा सल्ला सुजय विखे यांनी यावेळी दिला.
(कै.) बाळासाहेब विखे पाटील, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि राजीव गांधी यांसारख्या दिग्गज नेत्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र आश्वी बुद्रुक येथे माझा पराभव झाल्याचा जल्लोष करण्यात आला. यांची खंत बोलून दाखवताना मला काम करण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नाही, असेही सुजय विखे यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.