Uddhav Thackeray
Uddhav Thackeray sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ठाकरे सरकार गेंड्याच्या कातडीलाही लाजविणारे ; गिरीश महाजनांचा हल्लाबोल

सरकारनामा ब्युरो

जळगाव : महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर पुन्हा एकदा भाजपचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी हल्लाबोल केला आहे. महविकास आघाडी सरकार निष्क्रिय सरकार आहे. राज्यातील सरकार (Thackeray government) हे आजपर्यंतचे सर्वात निर्लज्ज आणि गेंड्याच्या कातडीला देखील लाजविनारे आहे,असा सणसणीत टोला माजी मंत्री भाजप आमदार गिरीश महाजन यांनी लगावला आहे. महाजन आज जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

गिरीश महाजन म्हणाले, ''आज राज्यात विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत, सामान्य माणसाचे हाल सुरू आहेत. मंत्री केवळ आरेरावी करीत आहेत, जनतेचे मात्र हाल होत आहेत, त्यामुळे राज्यातील सर्व घटक तीव्र नाराज आहेत,''

''राज्यातील सर्वच प्रश्न या सरकारने वेशीला टांगले आहेत, त्यांना एसटी कामगारांचे प्रश्न दिसत नाहीत, या मंत्री मंडळातील कोणाशीही कोणाला काहीही देवघेण नाही,कोणताही मंत्री उपोषण करतो, आंदोलकांना जावून भेटत नाहीत,'' असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.

''विद्यार्थी, सामान्य माणसांचे हाल सुरू असून ग्रामीण भागातील रक्तवाहिनी एसटी बंद पडली आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारला काही पडली. विजेचा प्रश्न, नोकर भरतीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल, कुणाला काही पडलेले नाही, '' असे गिरीश महाजन म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवारांपुढे धुळ्यातील राष्ट्रवादी विस्ताराचे आव्हान!

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) स्थानिक स्तरावरील वाढत्या कुरबुरी, तक्रारींमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. आता त्यांनीच हस्तक्षेप करत जिल्ह्यात पक्षाची वाढ का खुंटली, यामागची कारणे जाणून काय त्या ठोस उपाययोजना कराव्यात, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. पक्षाचे काही वरिष्ठ पदाधिकारी, मंत्री, नेतेमंडळी शेजारच्या जिल्ह्यांमध्ये आली तरी धुळ्याकडे का फिरकत नाहीत, यावर स्थानिक पातळीवर आत्मचिंतन होण्याची गरजही कार्यकर्ते व्यक्त करतात. राष्ट्रवादीत नवे-जुने असा वाद लपून राहिलेला नाही. यात एका गटाला आजही भाजपमध्ये गेलेले आणि पूर्वाश्रमीचे पक्षाचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचा दुसऱ्या गटावर ताबा असल्याचे वाटते. त्यामुळे कदमबांडे समर्थकांना कार्यकारिणीत स्थान देऊ नये, असा आग्रह संबंधित गटाकडून धरला जातो. असा समज मात्र दुसऱ्या गटाकडून खोडण्याचा प्रयत्न होतो. अशा समज-गैरसमजाच्या फेऱ्यात पक्ष अडकल्याने त्याची वाढ खुंटल्याचे एक कारण कार्यकर्ते मांडतात. याविषयी एकदा सोक्षमोक्ष लावला जावा, असे त्यांना वाटते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT