Chandrashekhar Bavankule
Chandrashekhar Bavankule Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bavankule: कल्याणमध्ये शिंदे गटावर विसंबून राहता येणार नाही

Sampat Devgire

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्‍वभूमीवर भाजपकडून (BJP) मोर्चेबांधणी सुरू करण्यात आलेली आहे. राज्यात लोकसभेसाठी भाजपच्या जागा वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात बारामती (Baramati constituency) मतदारसंघात तयारी सुरु आहे, तसेच कल्याण (Kalyan) मतदारसंघातही संघटनात्मक उभारणी केली जात आहे. कल्याण मतदारसंघात फक्त एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावरच विसंबून राहता येणार नाही. ते कमी पडले तर भाजपची ताकद असली पाहिजे, असे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) म्हणाले. (BJP state president Chandrashekhar Bavankule communicate with journalists in Nashik)

ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रातील १६ मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे मंत्री येत्या दीड वर्षात प्रत्येक मतदारसंघात किमान दर तीन महिन्यांनी सहा वेळा भेट देऊन आढावा घेणार आहेत.

मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल सूर्या येथे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शहरातील प्रसारमाध्यमांच्या प्रमुखांची बैठक घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रसारमाध्यमांच्या प्रमुखांसह आमदार देवयानी फरांदे, आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, लक्ष्मण सावजी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. श्री. बावनकुळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीकडून ‘लोकसभा प्रवास योजना’ सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांवर प्रत्येक राज्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. यानुसार, महाराष्ट्रासाठी १६ मंत्र्यांची निवड करण्यात आलेली आहे. हे मंत्री येत्या दीड वर्षात दर तीन महिन्यांनी प्रत्येक मतदारसंघात सहा वेळा जाणार आहेत. केंद्राच्या योजनांसह कामकाजाचा आढावा त्यांच्यामार्फत घेतला जाणार आहे, जेणेकरून राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्यावर भर राहणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

दोन दिवसांत पालकमंत्र्यांची घोषणा

शिंदे-फडणवीस यांचे राज्यात सरकार येऊन दोन-अडीच महिन्यांचा कालावधी उलटला तरीही अद्याप जिल्ह्यांना पालकमंत्री लाभला नसल्याबद्दल विचारले असता, त्या संदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची नुकतीच बैठक झाली आहे. येत्या दोन दिवसांत पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा होईल, असा विश्‍वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

राज-फडणवीस चांगले मित्र

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे-फडणवीस युती २०० पेक्षा अधिक जागा निवडून येतील. मनसेसोबत युतीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. राज ठाकरे फडणवीस यांचे चांगले मित्र आहेत. मैत्रीपूर्ण संबंधातून भेटी होतात, त्यात युतीचा विषय चर्चिला गेला नसल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT