Jalgaon crime News: वाळू माफिया आणि वाढती गुन्हेगारी हा पाचोरा मतदारसंघातील गंभीर प्रश्न बनला आहे. नुकतेच भारतीय जनता पक्षात आलेले माजी आमदार दिलीप वाघ यांनी त्यावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यामुळे यावरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत.
पाचोरा मतदारसंघात गेल्या काही दिवसात गावठी बंदुकांचा वापर गुन्हेगार करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानकाच्या आवारात भर दिवसा आणि गर्दीतच दोन दिवसांपूर्वी खून झाला. आधीही कुणाच्या घटना घडल्या आहेत. मात्र पोलिसांकडून ठोस कारवाई झालेली नाही.
यासंदर्भात माजी आमदार दिलीप वाघ यांनी पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. सूर्यातील आमदार गुन्हेगारांना संरक्षण देऊन आपल्या कर्तव्य पासून दूर जात आहेत. वाढती गुन्हेगारी आणि मोकाट सुटलेले गुन्हेगार याबाबत पोलिसांना इशारा देऊनही कार्यवाही होत नाही. यापुढे असे झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नेते असलेल्या वाघ यांनी दिला आहे.
माजी आमदार वाघ म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण शहरात गुन्हेगारांकडे गावठी कट्टे मुबलक आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली होती. त्यांनी कोंबिंग ऑपरेशन केले असते तर यातून गुन्हेगारांना आळा बसला असता. मात्र पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही.
शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. निष्क्रिय पोलीस यंत्रणा त्याला कारणीभूत आहे. पोलीस अधिकारी काय काम करतात?. कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करण्याचे काम त्यांनी केलेले नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप आहे.
यावेळी माजी आमदार वाघ यांनी पाचोर्याच्या पोलिस अधिकाऱ्यांना थेट आव्हान दिले. पोलीस अधिकारी रात्री दुकाने बंद करण्यास भाग पाडतात. मात्र रात्री ११ ते पहाटे चार वाजेपर्यंत बेकायदा वाळूची वाहतूक जोमाने सुरू असते. बाळू चोरांना पोलीस यंत्रणेचे संरक्षण असल्याशिवाय तसे होऊ शकत नाही. पोलिसांची तयारी असल्यास आपण त्याचे व्हिडिओ शूटिंग आणि सर्व पुरावे देण्यास तयार आहोत. कारवाई करणार का? असा प्रश्न त्यांनी केला.
माजी आमदार वाघ हे पाचोरा मतदार संघातील राजकीय क्षेत्रातील नावाजलेले नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी केली होती. आमदार किशोर पाटील आणि माजी आमदार वाघ यांचे राजकीय सख्य या निमित्ताने पुढे आले आहे.
सत्ताधारी पक्षाकडूनच कायद्याने सुव्यवस्थेचे वाभाडे काढण्यात आले आहेत. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कारभारावर अप्रत्यक्षपणे टीका मानली जाते. तिकडे जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे सर्व सूत्रे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आहेत. त्यामुळे माजी आमदार वाघ यांचा रोख स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका करणे आहे हे लपून राहिलेले नाही. मात्र त्यांचा निशाणा पालकमंत्री गुलाबराव पाटील की भाजप नेते गिरीश महाजन याचीही या निमित्ताने चर्चा आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.