Vijaykumar Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vijayakumar Gavit: 'लोकसभेनंतर ठरवू कुठं जायचं ते'; भाजप मंत्र्यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल; मानहानीचा गुन्हा दाखल करणार

Nandurbar News:ऑडिओ क्लिप संदर्भात पुष्टी न करता माझ्या नावाने प्रसारित करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधितांवर 100 कोटींचा मानहानी गुन्हा दाखल करणार असल्याचे विजयकुमार गावित यांनी सांगितले.

सरकारनामा ब्यूरो

Nandurbar :राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijayakumar Gavit) यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल (Video clip viral) होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Constituency 2024) पार्श्वभूमीवर ही क्लिप व्हायरल झाल्याने लोकसभा निवडणुकीनंतर विजयकुमार भाजपला (bjp)सोडचिठ्ठी देणार का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. गावित एका कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याची ती क्लिप आहे. 'सरकारनामा'या व्हिडीओ क्लिपची पुष्टी करीत नाही.

'लोकसभेनंतर ठरवू कुठे जायचं ते' अशा प्रकारचा संवाद या व्हिडिओ क्लिपमध्ये आहे. सध्या ही क्लिप व्हायरल होत आहे. त्यावर मंत्री विजयकुमार गावित यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'विरोधकांकडून बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून खोट्या पद्धतीच्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल केल्या जात आहेत. अशा कुठल्याही प्रकारचं वक्तव्य मी केलं नसल्याचे गावित यांनी स्पष्ट केल आहे. संबधित ऑडिओ क्लिप संदर्भात पुष्टी न करता माझ्या नावाने प्रसारित करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधितांवर 100 कोटींचा मानहानी गुन्हा दाखल करणार असल्याचे विजयकुमार गावित यांनी सांगितले.

दरम्यान मंगळवारी डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात आयोजित शबरी घरकुल योजनेचे आदेश वाटप व कामगार कल्याण मंडळाच्या गृहोपयोगी वस्तुंच्या वितरण करण्यात आले.

डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, "नंदुरबार तालुक्यात ३ हजार ३३६ पात्र आदिवासी बांधवांना शबरी योजनेतून घरकुले देण्याचा मानस आहे. कामगार, मजूर बांधवांना आवश्यक असलेली गृहोपयोगी भांडी तसेच मोफत उज्ज्वला गॅस कनेक्शनही दिले जाईल,"

यावेळी खासदार डॉ. हिना गावित, आमदार आमश्या पाडवी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हा परिषद सदस्या राजश्री गावित, अर्चना गावित नटावदच्या सरपंच जयश्री गावित नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी चंद्रकांत पवार उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT