Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Called Manoj Jarange : गिरीश महाजन स्पष्टच बोलले, मराठा समाजाने सरकारला आणखी वेळ द्यावा!

Manoj Jarange Patil Uposhan in Antarwali : ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल

Sampat Devgire

Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविताना राज्य सरकारने ४० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देणार, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यावर मुदत संपल्यावरदेखील निर्णय झालेला नाही. याबाबत राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (BJP leader Girish Mahajan assures that state Government will give Reservation for Maraha)

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याबाबत राज्य सरकार (Maharashtra Government) काय भूमिका घेणार? याची उत्सुकता ताणली गेली आहे. याबाबत भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महाजन नाशिक येथे एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अतिशय गतीने काम सुरू आहे. प्रशासनाकडून त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मनोज जरांगे-पाटील यांनी ४० दिवसांची मुदत दिली. आम्ही आरक्षण देण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीचे काम सुरू आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेली काही वर्षे चर्चेत आहे. त्यात न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यायचे असेल, तर कायदेशीर आधार द्यावा लागेल. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. आरक्षण आमचेच सरकार देईल. आरक्षणाबाबत चर्चाही सुरू राहिली पाहिजे, चर्चेतून मार्ग निघेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाने पुन्हा उपोषणाला बसून, शरीराला ताण देऊन फार काही उपयोग होणार नाही. सरसकट कुणबी प्रमाणपत्राची काही ठिकाणी आवश्यकता नाही, असा मतप्रवाह आहे. परंतु, मराठवाड्यात त्याची आवश्यकता आहे. त्याचा समिती अभ्यास करीत आहे.

अजून किती दिवस लागतील, हे मला सांगता येणार नाही. आमच्या सरकारवर लोकांचा विश्वास असल्याने आमच्या काळात मोर्चे निघत असल्याचे ते म्हणाले. माजी खासदार नीलेश राणे यांच्या निवृत्तीबाबत महाजन यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी असा निर्णय कसा घेतला, असे महाजन म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT