Amit Thackeray and Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahajan On Amit Thackeray: अमित ठाकरे हे बालिश; गिरीश महाजनांकडून समाचार

सरकारनामा ब्यूरो

Jalgaon News: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी आमदार फोडण्यावरून केलेल्या विधानावर आता भाजपचे नेते त्यांना लक्ष्य करीत आहेत. त्यात भाजपचे नेते, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही अमित ठाकरे हे बालिश असल्याचे माध्यमांपुढेच बोलून दाखवले. पुढचे काही दिवस अमित ठाकरेंच्या या विधानावर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत राहणार आहेत.

इर्शाळवाडीची घटना घडल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर टीकेचा सूर ठेवून आमदार फोडाफोडीची आठवण करून दिली. अमित ठाकरेंच्या आरोपाने भाजप नेते अस्वस्थ झाले. ते आता अमित ठाकरेंना प्रत्युत्तर देत असल्याने भाजप-मनसेत वादंग होण्याची चिन्हं आहेत. यावर शुक्रवारी नितेश रोणे यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आज महाजन बोलले आहेत.

"सरकार आमदार फोडण्यात व्यस्त असल्याने इर्शाळवाडीची दुर्घटना घडली. हे अमित ठाकरेंचं विधान अत्यंत बालीशपणाचं आहे, असेच म्हणावे लागेल. कारण सरकार लक्ष ठेवून होते. धोकादायक क्षेत्राच्या यादीत इर्शाळवाडीचे नावही नव्हते. परंतु त्या ठिकाणी अचानक नैसर्गिक घटना घडली, त्यामुळे या दुर्दैवी घटनेचे कुणीही राजकारण करू नये. अतिवृष्टी, जोरात हवा यामुळेच ही घटना घडली", असं महाजन यांनी म्हटलं.

"इर्शाळवाडीच्या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी घरे वीस फूट खाली गाडली गेलीत. त्या ठिकाणी कोणतीही साधणे पोहचविणे शक्य नाही. त्यामुळे माणसातर्फेच काम करावे लागत आहे. त्या ठिकाणी मदतीचे काम करणेही कठीण होत आहे.

त्यामुळे आता दोन दिवसांनी त्या ठिकाणचे काम थांबवावे लागणार आहे. माळीण येथे घडलेल्या घटनेप्रमाणे मृतांना काढणेही शक्य होणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणी ते डिस्पोज करावे लागणार आहे. त्यामुळे कोणकोण दबले गेले याचा जागेवरच पंचनामा करण्यात येईल. तसेच या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे", असंही त्यांनी सांगितलं.

भाजपचे नेते गिरीश महाजन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'भावी मुख्यमंत्री'च्या बॅनरही बोलले. "असा अतातायीपणा भाजप-राष्ट्रवादीच्या कोणीही करू नये. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली २०२४ च्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री बदलाबाबत प्रश्नच येत नाही", असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT