narayan rane
narayan rane sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेना दिशाहीन झालेला पक्ष; राणेंनी पुन्हा डिवचलं

कैलास शिंदे :सरकारनामा ब्युरो

जळगाव : एमआयएमचे (Aimim) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यासोबत झालेल्या सांत्वनपर भेटीत महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावामुळे राज्याच्या राजकारणात संध्या खळबळ उडाली आहे. भाजपने शिवसेनेवर (shivsena) जोरदार टीका केली आहे. या प्रस्थावावर भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे.

नारायण राणे हे आज जामनेर येथे आमदार गिरीश महाजन यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले ''की शिवसेना आता एमआयएम नव्हे तर कोणाबरोबर ही युती करू शकेल. शिवसेनेला कोणतीही दिशा राहिलेली नाही, तत्व व धोरण राहिले नाही आहे. तो आता दिशा हीन पक्ष झालेला आहे, अशी टीका त्यांनी केली.

या वेळी माध्यम प्रतिनिधीनी राणे यांना एमआयएम विषयावर अधिक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर राणे म्हणाले, जाऊद्या आम्हाला आमचे विमान चुकेल. शिवसेनेवर नियमीत तोंडसुख घेणाऱ्या राणे यांनी अशी भूमिका घेतल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला.

दरम्यान, खासदार व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी एमआयएमशी (AIMIM) आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. एमआयएम ही भाजपची (BJP) बी टीम असून कधीच युती करणार नाही, असे ठाकरेंनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षही शरद पवार यांनी हा प्रस्थाव नाकारला आहे. तरीही इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT