Mayor Pradip karpe & Minister Hardeep singh puri Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP News: भाजपचे प्रदीप कर्पे म्हणतात, `महापौरांना आदराचे स्थान द्यावे`

महापौर संमेलनात प्रदीप कर्पे यांनी स्मार्ट सिटी योजनेत धुळ्याचा समावेष करण्याची शासनाकडे मागणी केली.

Sampat Devgire

धुळे : धुळे (Dhule) शहराचा स्मार्ट सिटी (Smart City) योजनेत समावेश करावा, जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) बैठकीत महापौरांना (Mayors) पदसिद्ध निमंत्रित सदस्य म्हणून बोलवावे व आदराचे स्थान द्यावे, अशी मागणी महापौर प्रदीप कर्पे (Pradip Karpe) यांनी भाजपच्या (BJP) राष्ट्रीय महापौर संमेलनात केली. (Mayor Pradip Karpe deemands thst Dhule city shall inclued in Smart city project)

धुळे शहराचा स्मार्ट सिटीत समावेशाबाबत मागणीचे निवेदनही त्यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना दिले.

भाजपचे राष्ट्रीय महापौर संमेलन २० व २१ सप्टेंबरला गांधीनगर (गुजरात) येथे झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील, गुजरातचे मुख्यमंत्री भूरेंद्रभाई पटेल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आईसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, केंद्रीयमंत्री श्री. पुरी, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री बी. एल. संतोष, विद्या राहटकर आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.

संमेलनाला देशातून ११७ महापौर, उपमहापौर उपस्थित होते. महाराष्ट्रातून महापौर कर्पे, उपमहापौर अनिल नागमोते, ज्येष्ठ नगरसेवक हिरामण गवळी यांनी सहभाग नोंदविला. महाराष्ट्रातील भाजपची सत्ता असलेल्या बहुतांश महापालिकांचा कार्यकाळ संपल्याने महाराष्ट्रातून केवळ महापौर कर्पे यांनाच सहभागाची संधी मिळाली. ते म्हणाले, की संमेलनात शहराचा विकास, महापालिकांची आर्थिक स्थिती, महापौरांची भूमिका आदी विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महानगर प्रशासनात महापौरांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले.

‘डीपीडीसी’त निमंत्रण हवे

जिल्हा नियोजन समितीत जिल्ह्यासह शहर विकासाचे विषय असतात. त्यामुळे या समितीच्या बैठकीत महापौरांना पदसिद्ध निमंत्रित सदस्य म्हणून बोलावले पाहिजे, अशी राज्यव्यापी भूमिका संमेलनात मांडल्याचे महापौर कर्पे म्हणाले. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक ठोस निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिल्याचेही श्री. कर्पे यांनी नमूद केले.

स्मार्ट सिटीत समावेश करा

केंद्रीय मंत्री पुरी यांनी केंद्र सरकारच्या शहरी विकास योजना व कार्यक्रम या विषयावर मार्गदर्शन केले. संमेलनाच्या माध्यमातून धुळे शहराचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश करावा, अशी मागणी केल्याचेही महापौर कर्पे यांनी सांगितले. धुळे शहराचे राष्ट्रीय महामार्गांवरील स्थान, गुजरात, मध्य प्रदेशची लाभलेली सीमा, शहराची रचना आदी मुद्दे मांडत धुळ्याचा स्मार्ट सिटीत समावेशाची मागणी केल्याचे ते म्हणाले. खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, आमदार अमरिशभाई पटेल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनासह सूचनेप्रमाणे धुळे शहराचा स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश व्हावा, अशा मागणीचे निवेदन दिल्याचे श्री. कर्पे म्हणाले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT