Chhagan Bhujbal & Laxman Savji
Chhagan Bhujbal & Laxman Savji Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजप नेत्याची जीभ घसरली...छगन भुजबळांनी तोंड काळे करावे!

Sampat Devgire

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडल अध्यक्ष अमोल ईघे (Amol Ighe) यांची आज सकाळी हत्या झाली. त्याविरोधात भाजपच्या नेत्यांनी धरणे धरले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि पोलिस आयुक्तांविषयी बोलताना भाजप नेते लक्ष्मण सावजी (Laxman Savji) यांची जीभ घसरली.

या पदाधिकाऱ्याच्या खूनाच्या घटनेनंतर भाजपचे पदाधिकारी संतप्त झाले. त्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. पोलिस संशयीतांना पळून जाण्यासाठी मदत करीत आहेत, असा आरोप केला. सातपूर पोलिस ठाण्यापुढे धरणे धरले. पोलिस आयुक्तांनी येथे येऊन चर्चा करावी असा आग्रह धरला. आमदार सीमा हिरे, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, नगरसेवक दिनकर पाटील, महापौर सतीश कुलकर्णी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, हिमगौरी आडके, गणेश गिते, शंभू बागूल, विजय साने, मुकेश शहाने आदी विविध नगरसेवकांनी सकाळ पासून पोलिस ठाण्यासमोर धरणे धरले.

यावेळी श्री. सावजी म्हणाले, आज शहरातील पंचवीस लाख नागरिक अस्वस्थ आहेत. कारण भाजपच्या पदाधिकाऱ्याची हत्ता झाली आहे. महिला घराबाहेर पडताना घाबरतात, कारण रस्त्यावर चेन स्नॅचिंग कुठल्या चौकात होईल याचा भरवसा राहिलेला नाही. कुठल्या चौकात खून होईल याचा भरवसा राहिलेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहर अशांत आहे. शहरात भुरटे चोर, तोडपाणी करणारे, सुपारी घेणारे, चिंधीचोर या सगळ्यांना ऊत आलेला आहे.

ते पुढे म्हणाले, गुन्हे घडत आहेत, कारण गुन्हेगारांना माहिती आहे की, आम्हाला वाचवणारे पालकमंत्री आहेत. आमच सरकार आहे. पोलिस आयुक्त आमचा काहीच वाकडं करु शकत नाही. केवळ राजकीय हेतून ेप्रेरीत होऊन या विषयाकडे पाहून चालणार नाही. मानवी व्यावहारातून त्याकडे पाहिले पाहिजे. आमच्या जीवाभावाच्या कार्यकर्त्याचा खून झाला आहे. तो चोविस तास समाजसेवेसाठी फरित असतो. रात्री अपरात्री मदतीला येतो. कोरोना काळात त्यांनी काम केले. दिवसाढवळ्या सकाळी त्याची हत्या झाली आहे. कोणते सरकार आहे. कोणती कायदा आणि सुव्यवस्था आहे. कुठे गुप्तहेर यंत्रणा आहे. अचानक घटना घडतात. आधी पार्श्वभूमी माहित होत नाही?. पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने खून झाला.

त्यानंतर त्यांनी यांना सत्ता हवी. त्यासाठी हे आमचे मुडदे पाडत आहेत. गुन्हेगारांना राजरोस मोकाट सोडले आहे. पोलिस आयुक्तांची बदली झाली पाहिजे. त्यांनी त्यांचे तोंड काळे केले पाहिजे. पालकमंत्र्यांनी पण आपले तोंड काळे करावे, असे विधान केले.

दिड तास धरणे धरल्यानंतर भाजपच्या आमदारांनी पोलिस आयुक्तांशी संपर्क करून आंदोलन स्थळी येण्याचा निरोप दिला. मात्र आयुक्तांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पोलिसांनी धरणे धरलेल्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र या कार्यकर्त्यांनी विरोध करीत धरणे धरण्यावर ठाम राहिले. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या परिसरात तणाव होता.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT