Chandrashekhar Bavankule
Chandrashekhar Bavankule Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP News: हिंदुत्ववाद्यांच्या प्रवेशावर भर द्यावा

Sampat Devgire

धुळे : आगामी निवडणुकांचा (Elections) कालावधी पाहता स्थानिक पातळीवरील (Local) भाजपमध्ये (BJP) इतर पक्षांचे नेते नकोत, तर कार्यकर्त्यांचे प्रवेश करून घ्यावे. यात हिंदुत्ववादी (Hindutwawadi) कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर अधिकाधिक भर द्यावा, अशी सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chteadrandrashekhar Bavankule) यांनी कृष्णाई गार्डनमध्ये झालेल्या जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीत दिली. तसेच पक्षाचे स्वतःचे शहर व जिल्हा कार्यालय लवकरात लवकर झाले पाहिजेत, असे निर्देशही त्यांनी दिले. (Chandrashekhar Bavankule insist to joines workers insist of leaders joins workers in BJP)

श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्यीय जिल्हा कोअर कमिटीची बैठक झाली. शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, आमदार काशिराम पावरा, महापौर प्रदीप कर्पे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, जयश्री अहिरराव, मायादेवी परदेशी, डी. एस. गिरासे, यशवंत येवलेकर उपस्थित होते.

बावनकुळे यांची सूचना

जिल्ह्यात भाजप वाढीसाठी संघटिक प्रयत्न करावे. इतर पक्ष, संघटनांमधील लहान व हाडाच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर भर द्यावा. भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत, घरोघरी पोचवाव्यात. उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर अधिकाधिक भर द्यावा. बूथ सशक्तीकरण करताना पन्ना प्रमुखांनी भाजपप्रणीत सरकारच्या योजनांचा प्रचार व प्रसार करावा. बूथ क्षेत्रात मन की बात कार्यक्रम घ्यावा. तसेच १७ सप्टेंबर ते २० आक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करावा. यात रक्तदान, कुष्ठरोग व टीबीच्या रुग्णांना मदत, कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस आदी निरनिराळ्या प्रकारचे विधायक उपक्रम राबवावे. आगामी सहा महिन्यांपर्यंत पक्षाचे शहर व जिल्हा कार्यालय कसे होईल यादृष्टीने ठोस प्रयत्न करावे, अशी सूचना श्री. बावनकुळे यांनी बैठकीत दिली.

बूथ प्रमुखाशी संवाद

श्री. बावनकुळे यांच्या रूपाने भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रथमच बूथ प्रमुखांशी येथे संवाद साधत पक्ष कार्याचा आढावा घेतला. बडगुजर प्लॉटमधील बूथ क्रमांक ९४ चे कार्यकर्ते किरण चौधरी यांच्याशी श्री. बावनकुळे यांनी संवाद साधला. बूथच्या माध्यमातून उभारायचे कार्य आणि नियोजन यावर त्यांनी श्री. चौधरी यांना टिप्स दिल्या.

कार्यकर्त्याला ओएसडी करा

भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाच्या मंत्र्यांना त्या- त्या जिल्ह्यातील एका कार्यकर्त्याला ओएसडी करावे, असे सुचविणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मंत्री व मंत्रालयातील कामकाज लवकर व गतीने मार्गी लागू शकेल, असेही श्री. बावनकुळे म्हणाले. जिल्ह्यात पक्ष मजबूतीकरणासह शहर व जिल्हा कार्यालय स्थापनेबाबत जबाबदारीचे वाटप करावे, ती स्वीकारायला तयार असू, असे आमदार पटेल यांनी सांगितले.

जंगी स्वागताने भारावलो...

जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीत श्री. बावनकुळे यांनी शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांचे कार्य, नियोजनाची प्रशंसा केली. प्रदेशाध्यक्षांचे जंगी स्वागत, महिला व पुरुष कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती, पक्षिय मेळाव्याला गर्दी, खुल्या जीपमधून स्वागत मिरवणूक व महापालिका प्रवेशद्वारातील अनोखे स्वागत, शहर दौऱ्यातील प्रत्येक कार्यक्रमाचे अचूक नियोजन आदींबाबत श्री. बावनकुळे यांनी श्री. अग्रवाल व सहकाऱ्यांचे कौतुक केले

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT