Varkari morcha in Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sushma Andhare News; भाजप नेत्यांसह वारकऱ्यांनी काढली निषेध दिंडी

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यामुळे त्यांची पक्षातून हाकालपट्टी करावी

Sampat Devgire

नाशिक : शिवसेना (Shivsena) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी वारकरी संप्रदायातील (Varkari Community) संतांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ वारकरी संतप्त आहेत. या वक्तव्याबद्दल शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackerey) यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. श्रीमती अंधारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी आज येथे (Nashik) करण्यात आली. (Varkari community perform a protest march in Nashik against Sushma Andhare)

आज सकाळी या मागणीसाठी भाजपचे दिनकर पाटील व अन्य नेत्यांच्या पुढाकाराने काळाराम मंदिर ते रामतीर्थ अशी निषेधदिंडी काढली. यावेळी त्यांनी अंधारे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. पोलिसांना निवेदनही देण्यात आले.

यावेळी गोदावरीच्या रामकुंडावर अंधारे ज्या पक्षांमध्ये असतील त्या पक्षाला मतदान करणार नाही असे या नेत्यांनी सांगितले यावेळी अंधारे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. याच्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा समावेश नाही, असे वारकरी संप्रदायाकडून सांगण्यात आले होते, मात्र भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक दिनकर पाटील हे महानुभाव पंथाचे प्रतिनिधी म्हणून या दिंडीत सहभागी झाले त्यांनीही आपण राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर महानुभाव पंथाचे प्रतिनिधी म्हणून या दिंडीत सहभागी झालो असल्याचे सांगितले.

काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून या दिंडीला टाळ मृदुंगासह जय हरी विठ्ठल या घोषात प्रारंभ झाला. राम मंदिर दक्षिण दरवाजासमोर असणाऱ्या विठ्ठल मंदिराजवळ काही वेळ दिंडी थांबली. या ठिकाणी विठ्ठल रुक्मीणी आणि श्रीराम, हनुमंताने श्रीमीत अंधारे यांना सदबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना करण्यात आली. काळाराम मंदिर, सरदार चौकमार्गे रामतीर्थावर आल्यावर निवृत्तीनाथ संस्थानाचे संजयनाना धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली त्या ज्या कोणत्या राजकीय पक्षांमध्ये आहे त्या पक्षाला वारकरी संप्रदायातील कोणीही सदस्य मतदान करणार नाही, असे सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT