BJP leaders agitation at Jalgaon
BJP leaders agitation at Jalgaon Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपच्या खासदार, आमदारांचा महापालिकेत जनआक्रोश!

Sampat Devgire

जळगाव : ‘अवाजवी वाढीव घरपट्टी रद्द करा’, (House tax hike) ‘महापालिकेचा निषेध’, असो अशा घोषणा देत भारतीय जनता पक्षाने (BJP) बुधवारी जळगाव महापालिकेवर मोर्चा काढला. यामध्ये पक्षाचे खासदार, आमदार, माजी महापौर सहभागी झाले. त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

पक्षाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, खासदार उन्मेश पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, कैलास सोनवणे, डॉ. राधेश्‍याम चौधरी, अरविंद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यालयापासून मोर्चा निघाला. वाढीव घरपट्टीच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चा महापालिकेवर धडकला. पोलिसांनी प्रवेशद्वाराजवळच मोर्चा अडविला. तेथे कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली. नगरसेविका सीमा भोळे, ॲड. शुचिता हाडा यांच्यासह महिला व कार्यकर्तेही मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चा महापालिकेत आल्यानंतर प्रवेशद्वाराजवळ नेत्यांसह कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला. ‘वाढीव घरपट्टी रद्द झालीच पाहिजे’, ‘कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

आयुक्तांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

महापालिका आयुक्त डॉ. सतीश कुळकर्णी महापालिका प्रवेशद्वारावर आले. त्यांनी मोर्चेकरांची भेट घेतली. त्यांनी खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्यासोबत खाली बसून मोर्चेकरांशी संवाद साधला. वाढीव घरपट्टी चुकीची असेल, तर ती दुरुस्त करून दिली जाईल, तसेच २१ दिवसांची अट काढून नागरिक जेव्हा येतील तेव्हा त्यांची तक्रार सोडविली जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. तसेच घरभाडेकरू असलेल्या घरमालकाच्या वाढीव बिलांच्या तक्रारींबाबत नगरविकास खात्याकडून मार्गदर्शन मागविले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT