<div class="paragraphs"><p>Girish Mahajan</p></div>

Girish Mahajan

 

sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले महाजन; स्वतःच्या वाहनातून केले दवाखान्यात दाखल

कैलास शिंदे :सरकारनामा ब्यूरो

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) हे तातडीने मदतीसाठी धावत असतात, आज जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे अपघात (Accident) झाल्यानंतर ते स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आपल्या वाहनातून जखमींना रुग्णालयात दाखल केले.

लाकडाने भरलेल्या ट्रकचा व प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये घटनास्थळावर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर सुमारे दहा लोकांपेक्षा अधिक जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच तालुक्याचे आमदार गिरीश महाजन यांनी तात्काळ घटनास्थळ वर जाऊन अपघातग्रस्तांना तातडीची मदत केली. महाजन यांनी या वेळी स्वतःच्या वाहनात व अंबुलन्सच्या माध्यमातून रुग्णांना जामनेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळवून दिले. त्यानंतर रुग्णालयात जावून त्यांनी जखमी वरील उपचाराची माहिती घेतली.

हेही वाचा

एकनाथ खडसे, अहो १५ वर्षे लाल दिवा अन् १२ खाती तरीही मतदारसंघ भकास?

नाशिक : तुमच्याकडे १५ वर्षे लाल दिवा अन् बारा खात्यांचा कारभार होता. त्याचा काय उपयोग केला? मतदारसंघाचा विकास का करता आला नाही?. याच चुकीची शिक्षा लोकांनी तुम्हाला दिली आहे, तुम्ही तीच शिक्षा सध्या भोगत आहात, अशा आक्रमक शब्दात भाजप नेते गिरीश महाजन यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर तोफ डागली होती.

नगर पंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आज शिगेला पोहोचला. यासंदर्भात बोदवड येथे झालेल्या सभेत श्री. महाजन बोलत होते. त्यांनी भाजपचे उमेदवारच विजयी होतील असा दावा केला. ते म्हणाले, एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सहभागी होतो. मुख्यमंत्री पदासाठी पळतो. मात्र स्वतःचा मतदारसंघ भकास. मतदारसंघाची अवस्था काय आणि स्वतःला मोठे नेते म्हणायचे? अशी खिल्ली महाजन यांनी उडवली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT