नाशिक : नगर विकास विभागाच्या (City Devolopment) मूलभूत सोयीसुविधा विकास कार्यक्रमांतर्गत पंचवटी विभागातील (Nashik) इंद्रप्रस्थ नगरी येथील रस्त्यांच्या कामाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी उद्घाटन केल्याने भाजप (BJP) विरुद्ध शिंदे गट (Eknath Shinde Group) असा वाद पूर्व विभागात निर्माण झाला आहे. (BJP & Eknath shinde group came in front of each other on road`s credit)
खासदार गोडसे यांनी काही दिवसांपूर्वी सिन्नर विधानसभा मतदारसंघातदेखील उद्घाटन आटोपल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिक कोकाटे यांच्यात वाद निर्माण झाला आहे. त्या पाठोपाठ आता खासदार गोडसे थेट आमदार ढिकले यांना भिडल्याने आगामी निवडणुकांमध्ये वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मखमलाबाद येथील इंद्रप्रस्थ नगरी येथे एक कोटी तीन लाख रुपये किमतीच्या रस्त्याचे उद्घाटन खासदार गोडसे यांच्या हस्ते झाले. भाजपच्या माजी नगरसेविका सुनीता पिंगळे यांनीदेखील आमदार ढिकले यांना न कळविता गोडसे यांना उद्घाटनासाठी बोलविल्याने भाजपसाठीदेखील हा मोठा झटका मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.