जळगाव : भारतीय जनता पक्षाचे (BJP) भुसावळचे आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) यांचा वाढदिवस समारंभ चांगलाच रंगला. मात्र हा खरा चंग जरा जास्तच चढला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या उपस्थितीत विविध नेत्यांनी ठेका धरला. यावेळी आमदार सावकारे यांनी ` अरे दिवानो, मुझे पहचानो, मै हूँ डॅान` या गाण्यावर ताल धरला खरा मात्र तो भाजपच्या गिरीश महाजनांना इशारा होता, की एकनाथ खडसेंना दिलेला सन्मान हे कोडेच राहिले.
भाजपचे आमदार संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक आहेत. श्री. खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तरीही आमदार सावकारे व त्यांचे स्नेहाचे संबंध कायम आहेत. ज्या वेळी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्या वेळी त्यांच्या सोबत काही आमदार तसेच माजी आमदार भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची चर्चा आहे. श्री. खडसे आमदार व मंत्री झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
मात्र सध्या राज्यपालांनी बारा आमदारांची यादी अद्याप मंजूर केली नाही. त्या मुळे खडसे यांचे आमदार होणे रखडले आहे. कोरोनामुळे शरद पवार यांचा जिल्हा दौरा झालेला नाही. त्यामुळे सर्वच प्रवेश रखडले आहेत. यात त्यांचे कट्टर समर्थक भाजप आमदार संजय सावकारे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र सावकारे यांनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत स्पष्ट इन्कार केला होता. खडसे यांच्याशी त्यांचे संबंध चांगले आहेत.
जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला. सर्व आमदारांनी माघार घेतली. त्यावेळी आमदार सावकारे यांचा अर्ज कायम होता. ते जिल्हा बँकेचे भाजपचे एकमेव संचालक आहेत. २१ पैकी २० संचालक महाविकास आघाडीचे आहेत. ते खडसे समर्थक असल्याने त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने उमदेवार दिला नसल्याचे सांगण्यात येते. श्री. खडसे जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचे संपूर्ण २१ संचालक असल्याचा दावा केला जातो.
काल भाजप आमदार संजय सावकारे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी एकनाथ खडसे उपस्थित होते. श्री. खडसे यानी सावकारे याना केक भरवला. आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार त्याची चर्चा सुरू आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार सावकारे यानी `मैं हू डॉन` हे गीत सादर करून बहर आणला. त्याचा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होत आहे. राजकीय चर्चेला उधाण आले आहे. याबाबत आमदार सावकारे म्हणतात, श्री. खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले असले तरी त्यांच्याशी आपले कौटुंबिक संबंध आहेत. लग्न, वाढदिवस समारंभात सर्वच पक्षाचे लोक जात असतात त्यामुळे याला कोणताही राजकीय रंग देवू नये.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.