<div class="paragraphs"><p>MLA Suresh Bhole With POlice Officers</p></div>

MLA Suresh Bhole With POlice Officers

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

आमदार भोळे रुसले... दिलीप वळसे पाटलांच्या कार्यक्रमात लोकांमध्ये जाऊन बसले!

Sampat Devgire

जळगाव : शासकीय कार्यक्रम असल्यास स्थानिक आमदारांना पाचारण करावे असा शासकीय अध्यादेश आहे, मात्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील (Home Minister Deelip Walse Patil) यांनी जळगाव येथील पोलिस वसाहतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमात त्या आदेशाला बासनात गुंडाळ्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश भोळे (MLA Suresh Bhole) यांनी निषेध केला व मंत्र्यासोबत व्यासपीठावर बसण्यास नकार दिला.

जळगाव येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या पोलीसांच्या अत्याधुनिक वसाहतीचे उद्‌घाटन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते सोमवारी (ता. २०) करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच स्थानिक भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश भोळे यांना पाचारण करण्यात आले होते. उद्‌घाटनानंतर व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील व्यासपीठावर होते, मात्र आमदार भोळे हे खाली बसले होते. त्यावेळी त्यांना व्यासपीठावर बसण्याचा आग्रह करण्यात आला मात्र त्यांनी नकार दिला, मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आग्रहाने त्यांना व्यासपीठावर येण्याचा आग्रह केला त्यानंतर आमदार भोळे व्यासपीठावर विराजमान झाले.

याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले, की जळगावात पोलीसांसाठी अत्याधुनिक घरे असावीत यासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा केला, त्या माध्यमातून निधीही उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले. आपल्याला आज कार्यक्रमासाठी बोलविण्यात आले होते. आपण त्यानुसार कार्यक्रमासाठी गेलो, राज्याचे गृहमंत्री जळगावात आले म्हणून स्थानिक आमदार म्हणून आपण त्यांचा गुलाबपुष्प देवून सत्कार केला, मात्र प्रोटोकॉल म्हणून पालकमंत्र्यांनी उद्‌घाटन कार्यक्रमाच्या वेळी स्थानिक आमदार म्हणून आपल्याला बोलावयास हवे होते, मात्र त्यांनी उद्‌घाटन करताना आपल्याला बोलाविले नाही, तसेच त्या ठिकाणी वृक्षारोपण करतानाही त्यांनी हा प्रोटोकॉल पाळला नाही, त्यामुळे आपण त्याचा निषेध म्हणून व्यासपीठावर गेलो नाही, असेही त्यांनी सांगितले.

पोलिस वसाहतीचा शुभारंभ हा शासकीय कार्यक्रम होता, तो कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नव्हता, त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्थानिक आमदार कोणत्याही पक्षाचा असला तरी शासकीय प्रोटोकॉल म्हणून त्याचा मान राखावयास हवा. त्यांनी हा दुजाभाव करणे योग्य नाही.

सुरेश भोळे, आमदार, भाजप

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT