Seema Hiray & Sudhakar Badgujar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Seema Hiray Politics: भाजपच्या आमदार सीमा हिरे आणि बडगुजर यांच्यातील तणाव शिगेला, बडगुजर यांच्यावर केला गंभीर आरोप!

BJP MLA Seema Hire Accuses Badgujar Amid Rising Tension: सुधाकर बडगुजर यांच्यामुळे सिडकोला दूषित आणि अळीयुक्त पाणी मिळते, आमदार सीमा हिरे यांचा गंभीर आरोप.

Sampat Devgire

Hiray Vs Badgujar News: शिवसेनेतून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या सुधाकर बडगुजर यांच्यावर भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. याबाबत नगर विकास विभागानेही त्याची दखल घेतली आहे. महापालिकेकडून याबाबत कार्यवाहीचा अहवाल मागविण्यात येणार आहे. या निमित्ताने भाजपमध्ये अंतर्गत राजकारण तापले आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून सुधाकर बडगुजर यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. या प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांनी प्रखर विरोध केला होता. आमदार हिरे आणि बडगुजर हे सिडकोतील एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राहिले आहेत. त्यामुळे हा वाद गेले काही दिवस कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी चर्चेचा विषय होता.

भाजप आमदार सीमा हिरे आणि बडगुजर वाद आता थेट विधिमंडळात पोहोचला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आमदार हिरे यांनी नाशिक शहराच्या प्रश्नांवर तारांकित प्रश्न विचारला होता.

सिडको परिसरात दूषित आणि अळीयुक्त पाणी पुरवठा होतो. त्याला या योजनेचे कंत्राटदार बडगुजर अँड बडगुजर कंपनी जबाबदार आहे. त्यांच्यावर काय कारवाई केली असा प्रश्न हिरे यांनी उपस्थित केला होता.

आमदार हिरे यांचा प्रश्न गंभीर असल्याने नगर विकास विभागानेही त्याची दखल घेण्याचे मान्य केले. संदर्भात महापालिका प्रशासनाने कोणती कारवाई केली आणि काय तपास केला, वस्तुस्थिती काय आहे याचा तातडीने अहवाल मागविण्याचे आश्वासन संबंधीत मंत्र्यांनी दिले. या निमित्ताने भारतीय जनता पक्षात अंतर्गत वाद किती टोकाला पोहोचला आहे, हे उघड झाले आहे.

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून बडगुजर यांना पक्षात प्रवेश दिला. मात्र त्याला सिडको भागातील सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध होता. त्याची तक्रार थेट मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यामुळे बडगुजर यांचा प्रवेश लांबला होता.

ज्या कारणासाठी बडगुजर यांना अट्टाहासाने मंत्री महाजन यांनी प्रवेश दिला तोच आता वादाचा विषय होतो की काय अशी स्थिती आहे. महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या दरम्यान आमदार हिरे आणि बडगुजर दोघांच्या समर्थकांत हा वाद टोकाला गेला आहे. आमदार हिरे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला झाडून सर्व भाजप नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र बडगुजर तिकडे फिरकले देखील नाही.

हा वाद विधानसभेत पोहोचला तसाच आगामी महापालिका निवडणुकीत त्याचे पडसाद उमटणार हे लपून राहिलेले नाही. त्याची पहिली प्रचिती भाजपच्या उमेदवारांच्या यादीवरून होणार आहे. पक्षातील निष्ठावंत इच्छुक नगरसेवक आणि माजी नगरसेवक यांचा पत्ता कट झाल्यास त्याचे पडसाद निवडणुकीच्या प्रचारात आणि पर्यायाने निकालावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचा हा वाद मिटणार की आणखी वाढणार याची चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT