Bjp News: हिवाळी अधिवेशन नुकतेच नागपूरमध्ये पार पडलं. विविध मुद्यांवरुन हे अधिवेशन चांगलंच वादळी ठरलं. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केल्याचं पहायला मिळालं. (Raksha Khadse news update)
हिवाळी अधिवेशनाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
एकनाथ खडसे यांनी अधिवेशनात कापसाचा मुद्दा उपस्थित केला होता. कापसाला भाव नाही, भाव द्या. दोन्ही पक्षाच्या एकानेही कापसाचा हा प्रश्न अधिवेशनात लावून धरला असता तर सरकार झुकलं असतं, असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे. त्या पाठोपाठ आता भाजप खासदार रक्षा खडसेही कापसाच्या मुद्द्यावरून आक्रमक होत आहे. रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आहेत.
हिवाळी अधिवेशनात माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली नाही असा आरोप खडसे यांनी केला आहे. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. यामध्ये मुख्यमंत्रीही भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांचे समर्थन करीत असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.
अधिवेशनात एकमेकांवर आरोप करण्यातच फक्त वेळ गेला असं स्पष्ट बोलत खडसे यांनी हिवाळी अधिवेशनावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
खडसेंच्या या विधानाला रक्षा खडसे यांनी पाठिंबा दिला आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या. रक्षा खडसे म्हणाल्या, "यावर्षी कापसाला योग्य भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. मी सरकारची प्रतिनिधी म्हणून केंद्र सरकारकडे विषय लावून धरेल आणि राज्य सरकारकडेही या संदर्भात बोलणार आहे. कपाशीला भाव कसा वाढवता येईल, यासाठी प्रयत्न करेल,"
रक्षा खडसे यांच्या या विधानामुळे रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या या विधानाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.