Unmesh Patil
Unmesh Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजप खासदार म्हणतात, पावसाने तारले.. आता, कृषी विभागाने मारू नये!

Sampat Devgire

जळगाव : रासायनिक खतांच्या पुरवठ्यात अनियमितता असून त्याबाबत तातडीने दखल घ्यावी, यासह पिकांच्या नुकसानीबाबत कंपन्यांकडून दिशाभूल होतेय, त्याकडेही लक्ष द्यावे.. पावसाने यंदा तारले मात्र कृषी विभागाने शेतकऱ्यांना मारु नये, अशी मागणी खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी केली आहे. (Rains given relief, now Agreeculture department should act for farmers)

उन्मेष पाटील यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांची भेट घेत सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा केली. या वेळी कृषी उपसंचालक अनिल भोकरे, प्रकल्प उप संचालक कुरबान तडवी, भाजपा तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, पंचायत समितीचे सदस्य रवींद्र चौधरी, माजी सरपंच रवींद्र पाटील, भरारी फाऊंडेशन अध्यक्ष दीपक परदेशी, मोहीम अधिकारी विजय पवार, पोखरा प्रकल्प समन्वयक संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या केल्या मागण्या

रासायनिक खत बाजारपेठेमध्ये जादा दराने/लिंकिंगने घ्यावा लागत आहेत व काही ठिकाणी खत उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याची तत्काळ दखल घेत जळगाव जिल्ह्यात असलेल्या खतांचा बफर स्टॉक रिलीज करावे. गेल्या वर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जळगाव जिल्हा मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, मका इ. पिकांसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली होती. अंदाजे २०० कोटींचा निधी याअंतर्गत प्राप्त झाला होता. यावर्षी देखील योजनेत शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवित असून ज्या त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या दूर कराव्यात. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ‘पोकरा’ योजनेच्या योग्य अंमलबजावणीचाही निवेदनात उल्लेख आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT