Nashik News : नाशिक पदवीधर निवडणुकीत कॉंग्रेसच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या सत्यजीत तांबे यांना भाजपने मोठी ऑफर दिली आहे. तांबे यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याची संपूर्ण नाशिकमध्ये चर्चा होती. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता भाजपनेही जाहीरपणे सत्यजीत तांबेंना मदत केल्याचं मान्य केलं आहे. असे असतानात आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तांबेंना अप्रत्यक्षपणे भाजप प्रवेशाची ऑफरच दिली आहे.
सत्यजीत तांबे यांना भाजपमध्ये प्रवेश देणार का, असा सवाल बावनकुळे यांना विचारला असता, ते म्हणाले की, ‘सत्यजीत तांबे पक्षात येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. भाजपमध्ये अनेक लोक आले आहेत. ते पक्षात आल्यास कुणालाही अडचण नाही. मग सत्यजीत तांबे असो किंवा आणखी कुणी असो. त्यांचंही स्वागत करू.' अशा शब्दांत बावनकुळे यांनी तांबेंना ऑफर दिली आहे.
दरम्यान, 'पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबेंना पाठिंबा देण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ, असं बावनकुळे यांनी सांगितलं होतं. स्थानिक नेत्यांनीही तांबेंना ताकद दिल्याचे निवडणूक काळात दिसून आले. या निवडणुकीचे निकालही चांगले येतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपने आपला उमेदवारच जाहीर केला नव्हता. त्यामुळे भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण दुसरीकडे भाजपने छुप्या पद्धतीनं सत्यजीत तांबे यांना पाठिंबा दिल्याचीही नाशिकमध्ये चर्चा होती. इतकेच नव्हे तर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही या निवडणुकीत अप्रत्यक्षपणे सत्यजीत तांबे यांना मदत केली. त्यामुळे आता सत्यजीत तांबे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.