Ratna Patil in BJP Programme Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP News: हळदी-कुंकू कार्यक्रमात झाला विधवांचा सन्मान

धुळे येथे भाजपतर्फे झालेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमात धरती देवरे. शेजारी डॉ. माधुरी बोरसे, भारती माळी आदी सहभागी झाल्या.

Sampat Devgire

धुळे : (Dhule) राजकीय, सामाजिक संस्थांतर्फे सध्या हळदी-कुंकू कार्यक्रमांची रेलचेल आहे. त्यात दिले जाणारे वाण, मनोरंजनाचे कार्यक्रम, स्पर्धा यामुळे त्याचीही चर्चा होते. मात्र देवपुर येथे भाजपच्या (BJP) रत्ना पाटील (Ratna Patil) यांच्या पुढाकाराने झालेल्या कार्यक्रमात विधवा महिलांना (Womens) सहभागी करूत त्यांचा सन्मान करण्यात आल्याने त्याची विशेष चर्चा झाली. (BJP leader Ratna Patil organize a Haldi-Kunku programme)

शहरातील देवपूर भागात भाजपतर्फे रत्ना पाटील यांच्यातर्फे हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात झाला. या कार्यक्रमात विधवा महिलांचाही सन्मान करण्यात आला. दरम्यान, या कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धाही झाल्या. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

कार्यक्रमात विधवा महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात महिलांसाठी संगीत खुर्ची, उखाणे, फुगा, टोपी व नृत्य यासह विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. श्रीमती अहिराव यांनी लव्ह-जिहादवर, तर डॉ. श्रीमती बोरसे यांनी आरोग्य योजनांबाबत उपस्थितांना माहिती दिली. श्रीमती देवरे यांनीही मार्गदर्शन केले. नगरसेविका श्रीमती माळी यांनी प्रभातील विकासकामांची माहिती दिली. या कार्यक्रमाला परिसरातील महिला उपस्थित होत्या.

जिल्हा परिषदेच्या माजी सभापती धरती देवरे, भाजपच्या डॉ. माधुरी बोरसे, माजी महापौर जयश्री अहिरराव, मायादेवी परदेशी, भारती माळी, सुलोचना चौधरी, टीना काळे, प्रतिभा चौधरी, मोहिनी गौंड, मंजूषा लोहालेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मनीषा पाटील, चेतना पाटील, आशा पाटील, अलका फुलपगारे, प्रथमेश गांधी, अविनाश मराठे, करण लोंढे, विनोद चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT