Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics: भाजप आमदार तणावात; हरियाणा पॅटर्न म्हणजे आहे तरी काय?

BJP Politics; BJP'S city MLA under pressure about Haryana pattern-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सातत्याने हरियाणा पॅटर्नची चर्चा होत आहे.

Sampat Devgire

Nashik BJP News: राज्यातील विधानसभा निवडणुका केव्हाही जाहीर होतील अशी स्थिती आहे. त्यासाठी महायुती जोरदार तयारीला लागली आहे. विशेषता भाजप सावध पावले टाकीत असल्याने शहरातील भाजपचे आमदार कानोसा घेण्यात व्यस्त आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला सत्ताधारी म्हणून अँटी इन्कमबन्सीची भीती वाटते. त्यात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील फॅक्टर भाजप विरोधात कार्यरत होऊ शकतो. त्या दृष्टीने त्याला तोंड देण्यासाठी पक्षाची यंत्रणा काम करीत आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीला अनुकूल स्थिती नाही, अशी भीती नेत्यांना वाटते. त्याला लोकसभा निवडणूक निकालाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे हरियाणात भाजपने अनपेक्षितपणे तिसऱ्यांदा सत्ता कशी मिळवली, त्याच पद्धतीने काम होत आहे.

सध्या सातत्याने हरियाणा पॅटर्न ची चर्चा केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही त्याबाबत सजग आहेत. विशेषतः भाजप हरियाणा पॅटर्नची अंमलबजावणी करणार आहे. त्यासाठी सातत्याने सर्व्हे केले जात आहेत.

निवडणूक जिंकण्याची शक्यता ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या आमदारांच्या उमेदवारीचे आणि प्रचाराची दिशा ठरविण्याचे काम पक्षाची यंत्रणा करीत आहे. या संदर्भात हरियाणा पॅटर्ननुसार बुथ निहाय नियोजन केले जाणार आहे.

नाशिकमध्ये त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. १५ ऑक्टोबर पासून त्यासाठी बूथनिहाय बैठकांना प्रारंभ होईल. शहराध्यक्षांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत नुकताच पक्षाच्या शहर कार्यालयात झालेल्या बैठकीत नेत्यांनी सूचना दिल्या आहेत.

यामध्ये प्रत्येक बूथचे चार गटांत वर्गीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार कमी मते मिळालेल्या बूथ वर दुप्पट ताकद लावून मतांची आकडेवारी वाढविण्यासाठी काम केले जाईल. त्यावर सगळी मदार असेल.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने दोन मंत्र्यांसह विविध आमदारांना तिकिटे नाकारली होती. ज्यांचा परफॉर्मन्स समाधानकारक नव्हता, त्यांना उमेदवारी न देण्याचे धोरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदारसंघनिहाय झालेल्या बैठकांमध्ये निरीक्षकांनी सर्व पदाधिकाऱ्यांना कोऱ्या कागदावर तीन पर्याय सुचविण्याचे निर्देश दिले होते.

पक्षाने सर्वेक्षण देखील केले आहे. नाशिकमध्ये तीन पैकी दोन विद्यमान आमदारांना हे अहवाल अनुकूल नाहीत, असे बोलले जाते. त्यामुळे नाशिकमधील आमदार सध्या तणावाखाली आहेत. भाजप याबाबत काही निर्णय घेतो याची त्यांना उत्सुकता आणि धास्ती आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT