Satana APMC : सटाणा बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्रस्थापित नेते डॉ. विलास बच्छाव यांची पीछेहाट झाली. संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने बाजी मारली. या निवडणुकीमुळे सटाणा तालुक्यातील राजकारणाला वेगळे वळण मिळाले.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सटाणा बाजार समितीची निवडणूक झाली. त्यामुळे ती प्रस्थापितांसाठी प्रतिष्ठेची होती. दोन्ही पॅनल कडे भाजपच्या नेत्यांचाच भरणा होता. त्यामुळे भाजपचे आमदार दिलीप बोरसे यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे संजय चव्हाण हे देखील निवडणुकीपासून अलिप्त होते.
या निवडणुकीत संजय सोनवणे त्यांच्या नेतृत्वाखालील यशवंत शेतकरी विकास पॅनलला नऊ जागा मिळाल्या. डॉ बच्छाव आणि नानाजी दळवी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलला अवघ्या सहा जागा मिळाल्या. विशेष म्हणजे शेतकरी विकास पॅनलचे नानाजी दळवी आणि डॉक्टर बच्छाव हे दोघांचा धक्कादायक पराभव झाला.
यशवंत शेतकरी पॅनल: रवींद्र विठ्ठल सोनवणे, राहुल केदा सोनवणे, दिनेश अशोक गुंजाळ, मनोहर दयाराम बिरारी, माजी जिल्हा परिषद सदस्य सिंधुबाई संजय सोनवणे, काळू दौलत जाधव, निंबा पुंजाराम वानले, गणेश वामन ठाकरे आणि दीपक मधुकर रौंदळ असे नऊ संचालक विजयी झाले आहेत.
विद्यमान सत्ताधारी डॉ. विलास बच्छाव आणि नानाजी नाजी दळवी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलचे सर्व जागांवर उमेदवार होते. त्यांना पराभवाचा फटका बसला. पॅनलचे विजयी उमेदवार असे, किशोर जगन्नाथ खैरनार, प्रमोद वसंतराव बिरारी, डॉ राहुल वसंतराव सोनवणे, सुरेखा अरुण अहिरे, हरिभाऊ पांडुरंग जाधव आणि विनोद सीताराम अहिरे. पॅनलचे नेते पराभूत झाले.
या निवडणुकीत आडते व व्यापारी गटातून दीपक उर्फ डी. आर गोविंद सोनवणे आणि योगेश उर्फ भैया बाळासाहेब रौंदळ तसेच हमाल व तोलाई मतदारसंघातून संदीप दगा साळे हे अपक्ष निवडून आले.
या निवडणुकीत प्रादेशिक वाद आणि सत्ताधाऱ्यांकडून दबावाचे राजकारण महत्त्वाचा मुद्दा होता. शेतकरी विकास पॅनलने नानाजी दळवी, डॉ. बच्छाव आणि केवळ दळवी हे तीन उमेदवार लखमापूर या एकाच गावातील होते. त्यामुळे तालुक्यात त्यांच्याविरुद्ध नाराजी निर्माण झाली. तालुक्यात पूर्व विरुद्ध पश्चिम अशी थेट विभागणी मतदारांमध्ये झाली.
निवडणूक प्रारंभी बिनविरोध करण्याचा घाट डॉ. बच्छाव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घातला होता. त्यासाठी भाजपचे आमदार दिलीप बोरसे यांच्या नावाचाही वापर झाला. बिनविरोध करताना संजय सोनवणे यांना पूर्णतः बाजूला करण्यात आले होते. यातूनच सोनवणे यांनी यशवंत शेतकरी पॅनलची निर्मिती करीत निवडणूक जिंकली. प्रस्थापितांसाठी हा निकाल धक्कादायक ठरला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.