Shivsena-UBT-leader-Prathmesh-Gite-BJP-Leader-Uddhav-Nimse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime: धोत्रे हत्या प्रकरण; भाजप नेते उद्धव निमसे यांची अटकपूर्व जामिनासाठी वरीष्ठ न्यायालयात धाव?

BJP Politics; Two more arrested in Rahul Dhotre murder case, BJP leader Uddhav Nimse still absconding -फरारी भाजप नेते उद्धव निमसे म्हणतात, मी निर्दोष, धोत्रे प्रकरणाशी संबंधच नाही.

Sampat Devgire

Uddhav Nimse News: शहरातील राहुल धोत्रे खून प्रकरणावरून वातावरण अद्यापही तापलेले आहे. यावरून राजकीय आरोप आणि प्रत्यारोप सुरूच आहेत. दरम्यान या प्रकरणात सोमवारी आणखी दोन संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे.

राहुल धोत्रे खून प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यावर आरोप होत आहेत. ही घटना घडल्यानंतर श्री निमसे हे फरारी आहेत. पोलिसांची चारही पथके त्यांचा शोध घेऊ शकलेली नाहीत. त्यामुळे पोलिसांवरही या संदर्भात दबाव आहे.

दरम्यान फरारी असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी धोत्रे प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. धोत्रे प्रकरणात आपण मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. संदर्भात पोलिसांशी संपर्क करून हे प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

राहूल धोत्रे खून प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. या प्रकरणात आपण पूर्णतः निर्दोष आहोत. यासंदर्भात पोलिसांनाही त्याची कल्पना आहे. धोत्रे कुटुंबीयांनी माझे या प्रकरणात नाव का घेतले? हे अनाकलनीय आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान श्री निमसे वरिष्ठ न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्यांनी काही कायदेतज्ञांशीही संपर्क केल्याचे कळते. मात्र अद्याप त्यामध्ये त्यांना यश आलेले नाही. एकीकडे पोलिसांचा दबाव वाढत असल्याने श्री निमसे यांच्या अडचणी रोज वाढत आहेत.

दरम्यान पोलिसांनी सोमवारी संतोष बाळू मते आणि स्वप्निल मदन बागुल या दोघांना अटक केली. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी यापूर्वीच एसआयटी निर्माण केली आहे. परिस्थिती तणावपूर्ण असल्याने माजी नगरसेवक निमसे यांच्या निवासस्थानी अद्यापही पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT