Devendra fadanvis | Eknath Shinde
Devendra fadanvis | Eknath Shinde Sarkarnama News
उत्तर महाराष्ट्र

BJP Mission 200 : भाजप-शिंदे गटाचा 'मिशन 200' चा नारा ; कशी असेल भाजपची रणनीती?

सरकारनामा ब्युरो

BJP Mission 200 : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाने मिशन 200 चा नारा दिला आहे. लोकसभेसाठी मिशन 45 तर विधान सभेसाठी मिशन 200 चे लक्ष्य भाजपने निश्चित केले आहे. यासोबतच शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यत पोहोचवणार असल्याचे म्हटले आहे. (BJP-Shinde faction's 'Mission 200' slogan; What will be BJP's strategy)

नाशिकमध्ये शुक्रवारपासून (१० फेब्रुवारी) पासून भाजपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री, राज्यातील कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे प्रदेश पदाधिकारी आगामी निवडणुकांच्या रणनीती संदर्भात विचारमंथन करण्यात येत आहेत.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक व राज्यातील आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नाशिकमध्ये दोन दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू आहे. निवडणुकांसाठी रणनीती असावी, यावर खलबतं करण्यात आली. आजच्या या बैठकीत भाजप आणि शिंदे गटाचा राज्यात 200 चा नारा असणार आहे.

भाजपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक कालपासून नाशिक याठिकाणी सुरु झाली. स्थानिक स्वराज्य निवडणुकांसह राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि शिंदे गटाने मिळून मिशन 200 लक्ष ठेवले आहे. लोकसभेसाठी राज्यात भाजपचे मिशन 45 चे टार्गेट असतानाच आता विधान सभेसाठीही भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच मिशन 200 साठी भाजप शिंदे फडणवीस सरकारने केलेली कामे जनतेपर्यत पोहोचवणार आहे. आजच्या बैठकीत राजकीय आणि कृषी क्षेत्रासह विविध विषयांवर ठराव पारित होणार आहेत..

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मतं आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपमध्ये खलबतं सुरु आहेत. भाजपच्या कार्यकारणीत शिवसेनेची हिंदू मते स्वतःकडे खेचण्याची भाजपची रणनीती आखली जात आहे. येत्या काळात शिवसेनेची हिंदूत्व मते स्वतःकडे खेचण्यासाठी भाजप आक्रमक होणार आहे.

शिवसेनेकडे ८० टक्के मराठी, तर २० टक्के हिंदुस्तवादी मते आहेत. शिवसेनेच्या या २० टक्के मतांवर भाजपचा डोळा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेची ही मते खेचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT