BJP vs Congress Maharashtra : अहिल्यानगरमधील श्रीरामपूर सध्या जिल्ह्याचं राजकीय हालचालींचं केंद्र बनलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तिथं स्थानिक पातळीवर आपापसांत चांगलाच संघर्ष पेटला आहे. नगरपरिषद निवडणुकीत महायुती अन् महाविकास आघाडी एकसंघ राहणार की, वेगवेगळ्या भूमिका घेऊन लढणार, याची चर्चा सुरू असतानाच, नेते देखील एकमेकांना आजमावून पाहत आहेत.
भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील लोकसभेतील पराभव विसरले नसून, त्यावरून पुन्हा एकदा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना नाव न घेता सुनावत आहेत. विशेष म्हणजे, श्रीरामपूर दौऱ्यावर येताना थोरातांनी काही माजी नगरसेवकांना काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणला आहे. त्यावर विखे पाटील यांनी थोरातंवर टीका केली.
सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) म्हणाले, “ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान संगमनेरला गहाण ठेवला, ते स्वाभिमानाच्या गप्पा मारतात. त्यांना खासगीत जावून विचारा मी कसा आहे, असा टोला त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावताना लोकसभेत मला पाडणाऱ्यांना मी पाडून पुन्हा तुमच्यासमोर उभा आहे. कारण माझ्या मागे गोरगरिबांचा आशीर्वाद आहे. पिक्चर तिकडं बदलला आहे, आता हिकडंही बदलणार."
"श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील प्रत्येक प्रश्नासाठी आजही जनतेला आंदोलन करावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, घरकुलांसाठी लोकांना संघर्ष करावा लागला. आता संघर्ष संपला असून निर्णयाचा काळ सुरू झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील एकही प्रश्न येत्या चार वर्षांत प्रलंबित ठेवणार नाही,” असा ठामपणे सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
विखे पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्यातील राजकीय समीकरणावर जोरदार भाष्य करताना केले. ते म्हणाले, “गेल्या 25 वर्षांत सत्तेत राहिलेल्या लोकांना जनता आता विचारणार आहे, तुम्ही आमच्यासाठी काय केलं? फक्त मोबाईलवर राजकारण करणाऱ्यांना जनता आता ओळखते. श्रीरामपूरच्या एमआयडीसीत एकही उद्योजक यायला तयार नाही, कारण त्यांना सुरक्षितता वाटत नाही. हे बदलायचं असेल तर गलिच्छ राजकारण बदलावे लागेल." हरेगावला शेतीमहामंडळाची एक हजार एकर जमीन उपलब्ध आहे. तुम्ही महायुतीच्या मागे एकसंधपणे उभे राहा. याठिकाणी एमआयडीसी आणण्याची जाबाबदारी आपली, असा शब्द त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिला.
विखे पाटील यांनी, “40वर्षे लोक शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी फिरत राहिले, पण आम्ही तो प्रश्न सहा महिन्यांत सोडवला. आता आंबेडकर स्मारकाचा प्रश्न पुढच्या सहा महिन्यांत निकाली काढू. शेती महामंडळाच्या जागेवर सर्वसामान्य माणसाला घर मिळावं, यासाठी सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. दलित वस्तीसाठी 50 लाख रुपयांचा निधी जाहीर करतो. हरेगावसह तालुक्यातील आकारीपडीत जमिनीचा प्रश्न राज्यपालांच्या पातळीवर मांडला असून, पुढील आठ महिन्यांत तो सुटेल.”
हरेगाव इथल्या शेती महामंडळाच्या जागेवरील 601 घरकुल योजनेच्या प्रारंभ तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप आणि 11 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण यावेळी झाले. नितिन दिनकर, दिपक पटारे, बाबासाहेब चिडे, शरद नवले, गिरधार आसने, हरेगावचे सरपंच दिलीप त्रिभुवन आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.