BJP Vs NCP news : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केरळम् विधानसभा निवडणूक उरकून येताच, राहुरी पोटनिवडणुकीत सक्रिय होताच, भोंदूबाबा अशोक खरात याच्या भोंदूगिरीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांच्यावर निशाणा साधला.
विखे पाटलांनी हा निशाणा साधताना, सूचक विधान करताना, खासदार लंके यांचे नाव घेणं टाळलं आहे. पण, 'कुठलेही कॉन्ट्रोव्हर्सी काढा, तो व्यक्ती दिसणारच', असे म्हणून विखे पाटलांनी खळबळ उडवून दिली आहे.
नाशिकमधील (Nashik) विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारमान्यासंदर्भात, रूपाली चाकणकर यांची चौकशी होणार आहे. पोलिसांनी नोटीस देखील बजावली आहे. यावर बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले, "एसआयटी स्थापन आहे. चांगल्याप्रकारे चौकशी सुरू आहे. तपास सुरू आहे. सर्व काही बाहेर येणारच आहे."
सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी पुढे बोलताना, हे प्रकरण शिर्डीत उघडकीस आलं. पण अहिल्यानगर, शिर्डीचा मतदारसंघ असलेल्या, 40 वर्षे सेवा करणाऱ्या परिवाराचं कुठलाही संबंध आला नाही, असा दावा करत स्वतःच्या विखे पाटील कुटुंबाचं कौतुक केलं.
'एक वैशिष्ट पाहा. एवढ्या मोठ्याप्रमाणात जाळ पसरून देखील आमचा त्यात कुठही संबंध आढळत नाही. लोकप्रतिनिधी आणि एका परिवाराला क्रेडिट दिलं पाहिजे. जिथं एका तालुक्यामध्ये, शहरामध्ये भागामध्ये, एवढं सगळ पांगलेलं आहे. 40 वर्षामध्ये एक परिवार, त्या परिवारामधील कुठलाही घटक, अजिबात त्या प्रक्रियेत नाही. लोकप्रतिनिधी असा असला पाहिजे,' असे स्वतःच्या कुटुंबांचे कौतुक सुजय विखे पाटील यांनी केलं.
'काही लोकप्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी दिसतात. तुम्ही कुठलेही कॉन्ट्रोव्हर्सी काढा. तो व्यक्ती दिसणारच, खरात, सिस्पे, घोटाळा, खंडणी, कुठेही केस असो, तिथं हा लोकप्रतिनिधी वारंवार दिसतो,' असे विखे पाटील यांनी खासदार लंकेंचं नाव न घेता जोरदार निशाणा साधला.
'खरात प्रकरणामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. त्या महिलांची अब्रू गेली आहे. पोलिस तपास करत आहे. बँक खात्यांचे डिटेल्स दे्खील बाहेर पडायला सुरवात झाली आहे. भरपूर गोष्टी समोर येणार आहेत. बँक खात्याच्या चौकशीत अनेक माणसं समोर येणार आहे. कोणतरी पक्षाचा पदाधिकारी असू शकतो. पण कोणीही असो, त्यात पोलिस कारवाई करतील, अन् त्याला उचलतील,' असे विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.