BJP celebration In Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Assembly Election 2023 : ‘ही तर २०२४ च्या महाविजयाची नांदी आहे’

BJP supporters celebrates Victory of three states assebly election-भारतीय जनता पक्षाच्या नाशिकच्या कार्यकर्त्यांनी तीन राज्यांत भाजपच्या विजयाने नाशिकमध्ये जल्लोष केला.

Sampat Devgire

BJP Politics in Nashik : चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजपने तीन राज्यांत दमदार कामगिरी करीत सत्ता हस्तगत केली आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता हिसकावण्यात भाजप यशस्वी केल्याने नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करीत, ही तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या विजयाची नांदी असल्याचे म्हटले आहे. (BJP Party workers celebrate victory in three state assembly elections)

नाशिक (Nashik) शहर भाजप (BJP) कार्यालयापुढे पेढे वाटून आणि ढोल-ताशांच्या दणदणाटावर फेर धरीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या वेळी त्यांनी काँग्रेस (Congress) आणि विरोधी पक्षांच्या नेतृत्वाला जनतेने नाकारल्याचा दावा केला.

देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. त्यात भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्य प्रदेशातील आपले सरकार टिकवताना विक्रमी जागा मिळवल्या आहेत. छत्तीसगड आणि राजस्थान येथील सत्ताधारी काँग्रेसला पराभूत करीत ही राज्येदेखील हिसकावून घेतली. त्यामुळे तीन राज्यांतील या विजयाने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. आज शहर कार्यालयापुढे जमलेल्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि पंतप्रधान मोदी यांच्या विजयाच्या घोषणा देत जल्लोष केला.

या वेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी म्हणाले, या निकालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वैश्विक नेतृत्व आहे, हे सिद्ध झाले आहे. विरोधक त्यांच्यापुढे पालापाटोळ्यासारखे उडून गेले आहेत. जगातील व देशातील अनेक नेते व राजकीय पक्ष भाजपला या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी चंग बांधून बसले होते.

ते म्हणाले, मात्र त्या सर्वांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. पक्ष या निवडणुकीला अतिशय तयारीने सामोरा गेला होता. लगतच्या राज्यातील कार्यकर्तेदेखील त्यात सक्रिय होते. कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाला जनतेने स्वीकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि शिवसेनेचे संजय राऊत यांनी रचलेले मनसुबे उधळले गेले आहेत.

या वेळी सावजी, आमदार सीमा हिरे, महेश हिरे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, गिरीश पालवे, विजय साने, प्रदीप पेशकार, श्याम बडोदे, साहील मिर्झा, गुलाम सईद, अॅड श्रीधर व्यवहारे, अजिंक्य साने, गोविंद बोरसे, धनंजय माने, राकेश ढोमसे, बाळासाहेब पाटील, रवी पाटील, माधुरी पालवे, रवी जोशी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT