Vivek Kolhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics : शरद पवारांना विवेक कोल्हे भेटताच, भाजपच्या पोटात का उठला गोळा?

Vivek Kolhe met Sharad Pawar : पुणे इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत शरद पवार यांची युवा नेते विवेक कोल्हे यांनी भेट घेतली.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : कोपरगावमधील दिग्गज युवा नेते विवेक कोल्हे यांनी आज शरद पवार यांची पुणे इथं भेट घेतली. शरद पवार यांच्या पाया पडून विवेक कोल्हे यांनी आशीर्वाद घेतले. विवेक कोल्हे यांची ही कृती राजकीय उलथापालथीचे संकेत असल्याच्या चर्चेबरोबर भाजपला नगरमधून धक्का बसणार, असे बोलले जात आहे.

नाशिक शिक्षक विधान परिषद निवडणूक लढतीत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांना विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून चांगलीच टक्कर दिली. दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीची मते घेतली. ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उमेदवार किशोर दराडेंनी प्रतिष्ठेची केली होती. परंतु भाव खाल्ला तो विवेक कोल्हे यांनी! निवडणुकीच चर्चेस्थानी राहिले विवेक कोल्हे! विवेक कोल्हे निवडणूक लढवत असतानाच त्यांच्याविरुद्ध सरकार यंत्रणेचा वापर झाला. विवेक कोल्हे आणि त्यांच्या कुटुंबाशी निगडीत असलेल्या सहकारी संस्थांची तपासणी केली गेली. परंतु विवेक कोल्हे मागे न हटता अनुभवी राजकारणीप्रमाणे या कारवाईला समोरे गेले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या गव्हर्निंग कौन्सिलची पुण्यातील मांजरी इथं आज बैठक झाली. या बैठकीला विवेक कोल्हे यांनी उपस्थित लावली. शरद पवार यांची भेट घेत, त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या पाया पडले. विवेक कोल्हे यांची ही कृतीने भाजपच्या पोटात गोळा आला आहे. विवेक कोल्हे यांच्या आई माजी आमदार स्नेहलता कोल्हे भाजपमध्ये (BJP) आहेत. परंतु 2019 मध्ये अवघ्या काही मतांनी पराभव झाला. भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राजकीय खेळीमुळे हा पराभव झाल्याचा कोल्हेंचा आरोप आहे. तेव्हापासून मंत्री विखे यांच्याशी राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

विवेक कोल्हे यांनी नगरच्या राजकीय मैदानात उडी घेत थेट मंत्री विखेंना थेट आव्हान दिले. गणेश सहकारी साखर कारखाना, शिर्डी कर्मचारी युनियन सोसायटी, ग्रामपंचायत निवडणूक विखे यांच्या राजकीय बालेकिल्ल्यांना धक्के दिले. तसंच लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहिले. कोल्हे या भूमिकेवर भाजपमधून देखील नाराजी व्यक्त करण्यात आली. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेहलता कोल्हे यांच्या घरी भेट देत, चर्चा केली. परंतु तोडगा निघाला नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून विवेक कोल्हे भाजपमध्ये नाराज असून, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार, अशी चर्चा आहे. यातच आता विवेक कोल्हे यांनी शरद पवार यांची पुणे येथे भेट घेतल्याने या चर्चेला अधिक जोर चढला आहे.

वेगवान राजकीय घडामोडी

पुणे येथील बैठकीत माढ्याचे आमदार बबन शिंदे उपस्थित होते. त्यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली. आमदार शिंदे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटात आहेत. गेल्या पंधरा दिवसातील आमदार शिंदे यांची शरद पवार यांची दुसरी भेट आहे. या बैठकीला विजयसिंह मोहिते पाटील सहभागी झाले होते. याचवेळी रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये राहणार की, राष्ट्रवादी शरद पवार गटात येणार? यावर विजयसिंह मोहिते पाटील यांनी मला माहिती नाही, एवढीच प्रतिक्रिया दिली. विजयसिंह मोहिते पाटील आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे कट्टर राजकीय विरोधक आहे. परंतु बैठकीला ते एकत्र होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलाप वळसे पाटील, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, असे राज्यातील दिग्गज नेत्यांनी बैठकीला हजेरी लावली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT