CPM workers agitation at Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपने फक्त सत्तेत येण्यासाठी महागाईला विरोध केला!

महागाई विरोधात कम्युनिस्ट पक्षाची नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने

Sampat Devgire

नाशिक : केंद्र शासनाने (Centre Government) महागाई कमी करावी, अशी मागणी करीत गुरुवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे (CPM) जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले. भाजपने सत्तेत येण्यासाठी महागाईला विरोध केला, मात्र सत्तेत येताच जनतेला महागाईत ढकलले, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे करण्यात आला. (Agitation against BJP & Inflation at Nashik collectorate by CPM)

यावेळी पक्षाचे शहर सरचिटणीस सीताराम ठोंबरे म्हणाले, सत्तेत येण्यापूर्वी भाजप नेत्यांनी महागाई विरोधात आंदोलन करीत मत मागितली. त्यापूर्वी नागरिकांना ४०० रुपये घरगुती सिलिंडर मिळत होते, तसेच त्यावर अनुदान मिळत होते. मात्र, भाजप सत्तेत आल्यानंतर अनुदान बंद करून एक मोठा धक्का सरकारने दिला. यानंतर आठ वर्षात वारंवार गॅस दरवाढ करताना ३ दिवसांपूर्वी ५० रुपये दरवाढ करून १०५३ रक्कम आता मोजावी लागत आहे. त्याचबरोबर २० रुपये घरपोच सेवा देण्यासाठी द्यावे लागतात, असे मिळून ते सिलिंडर १०७३ रुपयांना मिळते.

डिझेल व पेट्रोलच्या किमती वाढवणे किंवा कमी करणे यावर सरकारचा कंट्रोल नाही, असे सरकार सांगत असले तरी निवडणुकांच्या काळात कोणतीही वाढ होऊ दिली नाही. त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढ करून व दाखविण्यासाठी अल्पशी रक्कम कमी करून जनतेची दिशाभूल करत आहेत.

सीएनजी व पीएनजी हे सुरवातीला स्वस्त मिळत असल्याने नागरिकांनी सीएनजी व पीएनजी वाहने खरेदी केली किंवा असलेली वाहने सीएनजी व पीएनजीवर करण्यात आली. मात्र, सीएनजी व पीएनजी वाढ ही आज डिझेल व पेट्रोल बरोबर होताना दिसत आहे. तरी केंद्र सरकारने दरवाढ त्वरित रद्द करून सामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे देविदास आडोळे, तुकाराम सोनजे संतोष काकडे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT