MLA Saroj Ahire, Deepak Balkawade & Vijay Karanjkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Vs Shivsena Politics: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत भाजपने बाह्या सरसावल्या, मात्र एकनाथ शिंदे यांचा शिलेदार त्यांची डाळ शिजू देईल का?

BJP-wants- power- Bhagur-in- Municipality- birthplace- of- Swatantryaveer- Savarkar- in- any- circumstances- this- time -भगूरच्या निवडणुकीत आघाडी सुस्तावली तर महायुतीच्या शिवसेना शिंदे, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लागली झुंज

Sampat Devgire

Bhagur municipality News: भाजपच्या दृष्टीने भगुर ही राजकीयदृष्ट्या संवेदनशील नगरपालिका आहे. भगूर पालिकेत सत्तेसाठी सर्व प्रयोग करण्याची तयारी पक्षाची आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेचा केली आहे.

भगूर नगरपालिका स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे या शहराशी भावनिक संबंध आहेत. गेले तीन टन येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची सत्ता राहिली आहे.

निवडणुकांमध्ये भाजपसह सर्व पक्षांनी जोर लावूनही ते शिवसेनेला रोखू शकले नाही. विशेष म्हणजे भाजपने एकनाथ शेटे यांसह जुन्या नेत्यांना बाजूला केले. मात्र त्यांचा हा प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही. भाजपची राजकीय स्थिती फारशी प्रभावी नाही.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भगूरचे माजी नगराध्यक्ष विजय करंजकर यांनी उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होऊ शकला नाही. मात्र आगामी नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने करंजकर यांचा दावा अधिक बळकट मानला जातो.

गेल्या तीन निवडणुकांमध्ये भगूर नगरपालिकेत शिवसेना ठाकरे पक्षाविरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन पॅनल करत आली आहे. त्यात त्यांना डबल डिजिट संख्याही गाठता आलेली नाही. राज्यात आणि केंद्रात सत्ता असलेल्या भाजपचा परभवाचा इजा, बिजा, तिजा झाला आहे. चौथ्यांदा तरी संधी मिळेल का याची उत्सुकता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांनाही मतदारसंघातील ही नगरपालिका हवी आहे. यासंदर्भात त्यांनी आजच पक्षाची आणि इच्छुकांची बैठक घेतली. विधानसभा सदस्य म्हणून शहराच्या विकासासाठी येथे सत्ता आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

भाजपकडे दीपक बलकवडे हे नवे नेतृत्व आहे. शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस पक्ष येथे अस्तित्वालाही दिसत नाही. राज्यातील सत्ताधारी महायुतीचे घटक तिन्ही पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. या स्थितीत महाविकास आघाडीची मरगळ मात्र अद्याप दूर झालेली नाही. त्यामुळे भगूर पालिकेत शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष विरुद्ध अन्य सगळे अशी सध्याची स्थिती जाणवत आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT