Jalgaon District Bank
Jalgaon District Bank sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपला धक्का : अजित पवारांच्या निकटवर्तीयांवरील कारवाई भोवणार

कैलास शिंदे :सरकारनामा ब्यूरो

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर 'ईडी'ची कारवाई सुरू आहे. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तीकर विभागाचे छापे टाकण्यात आले आहेत. या सूडबुद्धीच्या कारवाईमुळे आता भाजपला सोबत न घेतला जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेस या तीन पक्षाचे महाविकास पॅनल करण्यात यावे, असा सूर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) नेत्यांनी व्यक्त केला. त्यासंबंधी सर्वपक्षीय बैठक झाल्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (BJP will be excluded from the all-party panel of Jalgaon District Bank)

खडसे यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे. मात्र सहकारात राजकारण नको म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्हाबँक निवडणुकीत भाजपला सोबत घेवून सर्वपक्षीय पॅनल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सर्वपक्षीय कोअर कमेटीही निश्‍चित करण्यात आली आहे. त्याच्याही बैठका घेण्यात आल्या आहेत. आता जागा व उमेदवार ठरविण्यासाठी बाबत बैठक घेण्यात येणार आहे. मात्र, केंद्रातील भाजप प्रणित सरकारने अजित पवार यांच्या तीन्ही बहिणींच्या घरावर आयकर छापे टाकले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा बँकेच्या सर्वपक्षीय पॅनलमध्येही आता भाजपला सोबत घेवू नये, असा सूर राष्टवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक आज शिरसोली रोडवरील गुलाबराव देवकर कॉलेजमध्ये घेण्यात आली. यावेळी जिल्हध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी प्रदेशाध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, संजय पवार, वाल्मीक पाटील आदी उपस्थित होते. यावेळी काही नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यावर होत असलेल्या कारवाईमुळे भाजपला सर्वपक्षीय पॅनलमध्‌ये सोबत घेवून नये असे मत व्यक्त केले. जर राष्ट्रवादी अशा परिस्थितीत भाजपसोबत गेल्यास जनतेत चुकीचा संदेश जाईल, असे मतही काही नेत्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

देवकर म्हणाले..

याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची आज बैठक झाली, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेत्यावर केंद्राकडून होत असलेल्या कारवाईमुळे भाजपला जिल्हा बॅंक निडणुकीत सोबत घेण्यात अनेकांनी विरोध केला आहे. त्यामुळे आता शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या महाविकास आघाडीच्या पक्षाचेच पॅनल करण्यचा सूर व्यक्त होत आहे. मात्र भाजपसोबत अगोदर पॅनलबाबत दोन बैठका झाल्या आहेत. मात्र, तिसरी बैठक लवकरच होणार आहे. ती बैठक झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या पॅनलचा निर्णय जाहीर करण्यात येईल, असेही देवकर यानी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT