BJP candidates after Election result
BJP candidates after Election result Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

हिसाळे गणावर पुन्हा भाजपचे वर्चस्व!

Sampat Devgire

शिरपूर : येथील (Dhule) पंचायत समितीच्या हिसाळे गणासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार अमरीशभाई पटेल (Amrishbhai Patel) यांच्या नेतृत्वाखाली भाजपने वर्चस्व कायम राखले. भाजपचे (BJP) उमेदवार मनोज गायकवाड (Manoj Gaikwad) यांनी शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार संभाजी मंगल सोनवणे यांचा ६८२ मतांनी पराभव केला. गायकवाड यांना दोन हजार १८२ तर सोनवणे यांना दीड हजार मते मिळाली. १०७ मतदारांनी नोटाला पसंती दिली. (BJP defeats Shivsena in Shirpur taluka byelections)

हिसाळे गणाचे भाजपचे सदस्य बाळू गायकवाड यांची हत्या झाल्याने ही जागा रिक्त होती. त्यासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. भाजपतर्फे मृत गायकवाड यांचा मुलगा मनोज गायकवाड यांना संधी देण्यात आली. निवडणूक बिनविरोध होईल अशी अटकळ असतानाच शिवसेनेतर्फे संभाजी सोनवणे यांची उमेदवारी कायम राहिली. त्यामुळे सरळ लढत झाली. रविवारी (ता.५) हिसाळे गणांतर्गत दहा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारांनी निरुत्साह दाखविल्यामुळे केवळ ३९.१२ टक्के मतदान नोंदवण्यात आले.

येथील तहसील कार्यालयात सोमवारी मतमोजणीला सुरवात झाली. अर्ध्या तासातच निकाल जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार आबा महाजन यांनी मनोज गायकवाड यांच्या विजयाची घोषणा केली. प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांच्या उपस्थितीत मतमोजणी पार पडली. नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, मंडळ अधिकारी पी.पी.ढोले, पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. नीता सोनवणे यांनी मतमोजणीसाठी सहकार्य केले. अशोक कलाल, पं.स.चे माजी उपसभापती संजय पाटील यांनी गायकवाड यांचे अभिनंदन केले.

आमदार कार्यालयात आमदार काशिराम पावरा, अशोक कलाल यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT