Devendra fadnavis, Eknath shinde  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bjp Vs Shiv sena : नाशिक लोकसभा मतदारसंघ कोणाचा? भाजप-शिवसेनेत रस्सीखेच

Political News : दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे यांचे भावी खासदार असे फलकही मालेगावमध्ये यापूर्वी झळकले होते.

सरकारनामा ब्यूरो

अरविंद जाधव

Nashik : नाशिक लोकसभा मतदार संघात वर्षानुवर्षे शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत होत आहे. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे हा मतदारसंघ कोण लढवणार, यासाठी महायुतीतच रस्सीखेच सुरू झाली आहे. सध्याचे खासदार हेमंत गोडसे शिंदे गटाच्या शिवसेनेत आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून या जागेवर हक्क सांगितला जातो आहे. तर, शिंदे .गटाला दुसरी जागा देऊन नाशिकचा हक्क आपल्याकडे घेण्याची रणणिती भाजपाकडून आखली जाते आहे. राष्ट्रवादीचा अजित पवार गट सुद्धा येथे सक्रीय असल्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघात चार विधानसभा आणि महापालिकेतील सत्ता अशी मोठी राजकीय ताकद उभी असल्याने या मतदार संघावर भाजप दावा करतो आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दिंडोरीची जागा भाजपाकडून तर, नाशिक लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेनेकडून लढवली जात होती. यंदा मात्र, या जागांमध्ये बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते आहे. विशेषत: मालेगावमध्ये शिवसेनेचे (शिंदे गट) पालकमंत्री दादा भुसे यांचे वर्चस्व आहे. तसेच लोकसभेसाठी मालेगाव तालुका धुळे लोकसभा मतदार संघात जोडला जातो.

राजकीय दृष्ट्या भाजपा आणि शिंदे गटाला नाशिकच्या जागेची अदलाबदल झाल्यास फायदा होऊ शकतो. यामुळे दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे यांचे भावी खासदार असे फलकही मालेगावमध्ये यापूर्वी झळकले होते. धुळे लोकसभा मतदार संघात धुळे ग्रामीण, धुळे शहर आणि सिंदखेडा या तीन तर, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य आणि बागलाण या तीन अशा सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो.

१९९६ पासून दोन वेळेचा अपवाद वगळता येथे सातत्याने भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडूण आला आहे. भाजपाच्या दृष्टीने नाशिक लोकसभा मतदार संघ आपल्या हातात असणे आवश्यक होते. नाशिक लोकसभा मतदार संघात जवळपास ६० टक्के मतदार शहरी असल्याचा फायदा भाजपाला होऊ शकतो, असा दावा राजकीय विश्लेषकांकडून केला जातो आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT